*सर्वच जि.प.ला.लागू पडेल अशी बदली प्रक्रिया व बदलीचे विवरणपञ.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
💐जिल्हयाची वास्तव सेवाजेष्ठता यादी प्रसिद्ध झाली आहे. सदरील यादीत *आपली सर्व माहीती अचूक आहे का? त्याची खात्री करा*
💐जर बदलीपात्र यादीत तुमची काही माहीती चुकीची असेल तर हरकत घ्या
*दुरुस्तीचा लेखी अर्ज कार्यालयास देऊन पोच घ्या* ही यादी *अंतिम
झाल्यानंतरच* आपले बदलीचे विवरणपत्र भरून दयावे
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
आता यादीचे व्यवस्थित आकलन करून खालीलप्रमाणे बदलीचे विवरण पत्र भरून आपल्या *कें प्र कडे देऊन पोच घ्या*
*1⃣विवरण पत्र-१*
*जिल्यात सुगम क्षेत्रात दहा वर्ष सलग सेवा झालेल्या प्रत्येक शिक्षकाने हे विवरण पत्र भरून दयावे*
यामध्ये अ आणि आ असे दोन भाग आहेत
विनंती बदली नको असेल तर "अ"ची निवड करा
विनंती बदली पाहीजे असेल तर "आ"ची निवड करा
शाळांची निवड करताना प्रथम रिक्त पदे नंतर तुमच्यापेक्षा ज्युनियर शिक्षक जास्त असलेल्या २० शाळा निवडाव्या.
,*जर पसंतीक्रमानुसार तुम्हाला शाळा देणे शक्य नसेल तर शिल्लक रिक्तपदी आपली विनंती बदली प्रशासन करु शकते हा मोठा धोका आहे*
*बदलीस पात्र शिक्षकाची बदली होणारच असे बंधनकारक नाही*
म्हणून शाळा सोईची असेल तर *अ* ची निवड करा, शाळा खूपच गैरसोईची असेल तर *आ* ची निवड करने संयुक्तिक ठरेल
*2⃣ विवरण पत्र-२*
हे प्रपत्र अवघड क्षेत्रात काम करणाऱ्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी भरायचे आहे
*3⃣विवरण पत्र - ३*
विवरण पत्र ३ हे विशेष संवर्ग भाग १ मधील *अ*ते *औ*मध्ये येणाऱ्या तसेच *शुद्धीपत्रकातील* अंतर्भूत शिक्षकांनी भरुन दयावयाचे आहे
जर बदलीतून सूट पाहीजे असेल म्हणजेच सोईच्या ठिकाणी असाल तर मुद्दा क्र ८ समोरील चौकोणात✅ अशी खूण करा
किंवा तुमची सध्याची शाळा बदलायची असेल तर मुद्दा क्र समोर❎ खूण करा
आणि विनंती बदलीसाठी २० शाळांचा पसंतीक्रम द्यावा
*विशेष संवर्ग भाग १चे विवरण पत्र भरण्यासाठी सेवेची कसली अट नाही* जिल्यात कुठेही त्यांची बदली होऊ शकते
*4⃣विवरण पत्र-४*
जर पती आणि पत्नी यांच्या कार्यरत शाळामधील अंतर जर 3O कि मी पेक्षा जास्त
असेल तर त्या *दोघांना विशेष संवर्ग २*चा दर्जा प्राप्त होतो.
म्हणून त्या दोघांपैकी एकाने ( म्हणजे ज्याला बदली पाहीजे आहे) विवरण पत्र- ४ भरून दयावे
*विशेष संवर्ग भाग २ चा लाभ घेण्यासाठी सेवेचे, सेवाजेष्ठतेचे कसलेही बंधन नाही*
तो आपल्या जोडीदाराचीसुद्धा शाळा मागू शकतो.
अर्ज एकाने केल्यानंतर जर दुसऱ्याचे नांव बदली पात्र यादीत असेल तर ते वगळले जाईल
*जर पती- पत्नी कर्मचाऱ्यांच्या कार्यरत शाळामधील अंतर 3OKM पेक्षा कमी
असेल तर त्यांना विशेष संवर्ग भाग २ चा दर्जा प्राप्त होणार नाही*
मात्र ३0KM च्या आतील (म्हणजे एकत्रीकरण झालेले)पती पत्नींपैकी एकाला किंवा
दोघाला विनंती बदली पाहीजे असेल असेल तर ३0 KM च्या आत*१ युनिट* मानून
एकाच शाळेत किंवा वेगवेगळ्या शाळेत बदली मागता येते. मग या ठिकाणी पती
पत्नी या *दोघांपैकी १ बदली पात्र आणि १ बदली अपात्र असेल* तरीही त्यांना १
युनिट मानून विनंती बदली मागता येणार आहे त्यांनी २० पसंतीक्रम देताना
*प्रथम रिक्त* पदांची निवड करावी. नंतर तुमच्यापेक्षा ज्युनिअर
शिक्षकांच्या शाळांचा समावेश पसंतीक्रमात करावा
त्यांनी *विवरण पत्र क्र १* भरुन दयावे
*टिप*-
१)बदलीपात्र शिक्षकाने जर *विवरणपत्र भरून नाही दिले* अन प्रशासकीय कारणाने
जर त्याची बदली झाली तर प्रशासन दिल त्या ठिकाणी जावे लागेल म्हणून
*प्रत्येक बदली पात्रने विवरणपत्र भरून देणे आवश्यक आहे*
२)*जिल्हा बदलीने*आपल्या जि प मध्ये आलेल्या सर्वांची *सलग सेवा* जिल्हा
अंतर्गत बदल्यांसाठी *या जिल्हातील हजर दिनांकापासुन* पकडली जाणार आहे तसा
शासन निर्णय पूर्वीपासुन आस्तित्वात आहे
३)विशेष संवर्ग शिक्षक भाग १, आणि विशेष संवर्ग शिक्षक भाग २ यांना *विनंती
बदलीसाठी सेवेची कोणतीही अट नाही* अफवांवर विश्वास ठेऊ नका
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
संकलन आनंद देशपांडे