Pages

सुस्वागतम...सुस्वागतम...सुवागातम...

जिल्हा अंतर्गत बदली

 

विशेष संवर्ग 1

 

                 

 

जिल्हा अंतर्गत बदली    menual

डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 बदली विशेष-विशेष संवर्ग 2

      विशेष संवर्ग भाग 2 साठी Transfer Portal  सुरु झाले आहे...
        विशेष संवर्ग 2 म्हणजे सध्या 30 कि.मी.पेक्षा जास्त अंतरावर कार्यरत असलेले कर्मचारी.. यापेक्षा वेगळा कोणताही अर्थ लावू नये...
      अंतर मोजताना दोघांच्या कार्यालयामधील सर्वात नजीकच्या रस्त्याचे अंतर लक्ष्यात घ्यावे..

      विशेष संवर्ग भाग २  अंतर्गत खालील १ ते ६  घटकांचा समावेश होतो...


1) जि.प.शिक्षक-जि.प.कर्मचारी

2) जि.प.शिक्षक -राज्य शासकीय कर्मचारी

3) जि.प.शिक्षक-केंद्र शासकीय कर्मचारी

4) जि.प.शिक्षक-स्वायत्त संस्था (न.पा./म.न.पा. इ.)

5) जि.प.शिक्षक-शासकीय सार्वजनिक उपक्रम कर्मचारी

6) जि.प.शिक्षक-शासन मान्यताप्राप्त संस्थेतील कर्मचारी
फक्त कायम असावीत

 

विशेष संवर्ग भाग 2 अंतर्गत शिक्षकांना बदलीस नकार देता येणार नाही..

विशेष संवर्ग भाग 2 अंतर्गत शिक्षकांना बदली हवी असेल तर सेवेची कोणतीही अट नाही तसेच  जिल्ह्यातील कोणत्याही बदलीपात्र शिक्षकाची जागा तो मागू शकतो..( सिनीयर असो किंवा ज्युनियर)

💻 Online विवरणपत्र भरण्याची कार्यपद्धती...↓
 

१) HM login वरुन Transfer Portal login करा..

https://edustaff.maharashtra.gov.in/transfer/users/login/

२) 4 टॅब दिसतील,त्यातील Intra-District Transfer या टॅबला क्लिक करा...

३) त्यातील 1 ली Transfer Application या टॅबला क्लिक करा..

४) Select Designationमध्ये Headmaster/ Under graduate teacher/Graduate teacher यापैकी जे असेल ते क्लिक करा..

५) Select teacher मधून ज्यांचा form भरायचा त्या शिक्षकाला select करा..

६) संबंधित शिक्षकाची staff portal ला verify केलेली माहिती दिसून येईल..
     ज्यांची माहिती staff portal ला भरलेली नाही किंवा verify केलेली नाही, त्यांची नावे विवरणपत्र भरण्यासाठी दिसणार नाहीत...

७) Special Category 2 वर क्लिक करा..

८) Select sub-category वर क्लिक करा...

९) 06 संवर्ग दिसतील..लागू असेल तो निवडा..

१०) Select subject मध्ये सहशिक्षक असेल तर All subject असं दिसेल..

११) पदवीधर/विषयशिक्षक असेल तर शिक्षकाचा विषय निवडा..

१२) दोघेही जि.प.शिक्षक असतील तर Yes ला click करा...जोडीदाराचा Staff ID टाका..जोडीदाराचे नाव,पदनाम,कार्यालयाचे नाव इ.माहिती आपोआप दिसेल...दिसत नसेल तर टाईप करा...

१३)  दोघांच्या सध्याच्या शाळेमधील अंतर टाका...

१४) जोडीदार इतर आस्थापनेवर कार्यरत असेल तर जोडीदाराचे नाव,पदनाम,कार्यालयाचा पत्ता,अंतर टाईप करा......

१५) सर्व माहिती बरोबर असेल तर जास्तीतजास्त 20 पसंतीक्रम भरता येतील...

१६) पसंतीक्रम भरताना  जिल्हा निवडा किंवा आपोआप दिसेल...

17) त्यानंतर तालुका निवडा..जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची यादी दिसेल...त्यातील हवा तो तालुका निवडा..

१८) Select village मध्ये निवडलेल्या तालुक्यातील महसूली गावांची यादी दिसेल..गाव निवडा..

१९) Select school मध्ये निवडलेल्या महसूली गावातील सर्व जि.प.शाळांची नावे दिसतील,त्यातील शाळा निवडा...

अशाप्रकारे 20 शाळा निवडून add करत राहा..

भरलेल्या पसंतीक्रमामध्ये Save करण्याच्या आधी बदल करता येतील..

पसंतीक्रम delete करता येईल.. update करता येईल..पसंतीक्रम   खाली-वर करता येईल..

२०) आवश्यक तसे विवरणपत्र भरल्यानंतर save करा..

अर्ज save केल्यानंतर प्रिंटसाठी कसा दिसतो हे पाहण्यासाठी टॅब क्र.2 Veiw option(draft version)क्लिक करा..हा form मराठीतून दिसेल..

२१) माहिती तपासून ती बरोबर असल्यास टॅब क्र.3 Verification of transfer application क्लिक करा..

२२) माहिती पुन्हा तपासा..बरोबर असल्यास verify करा..

Verify केल्यानंतर विवरणपत्रात कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही...त्यामुळे जे काही बदल करायचे असतील ते verify करण्यापूर्वीच करावेत..

२३) Verify केल्यानंतर टॅब क्र.4 Print transfer application मधून प्रिंट काढण्यापूर्वी self certified या watermark सोबत मा.अवर सचिव कांबळे साहेब यांची स्वाक्षरी दिसेल...


     अशी स्वाक्षरी दिसणा-या form चीच print काढावी....


                                            दक्षता   

Online form हे HM/BEO login वरुन भरता येणार आहेत..

https://edustaff.maharashtra.gov.in/transfer/users/login/


   ज्या शिक्षकाचा form भरायचा आहे त्याच्या सहीने offline form स्थळप्रत म्हणून HM ने भरुन घ्यावा..


विशेष संवर्ग भाग २ मधील ६  घटकांपैकी आवश्यक घटकाचा खरा पुरावा शिक्षकाकडे उपलब्ध असेल तरच HM login वरुन संबंधित form भरावा..
      Online विवरणपत्राच्या ३ प्रती काढाव्यात..

१  प्रत संबंधित शिक्षकाला द्यावी..

१ प्रत पुराव्यासह शाळेत स्थळप्रत म्हणून ठेवावी...

१  प्रत पुराव्यासह BEO कार्यालयात जमा करावी...


    बदलीच्या कोणत्याही  टप्प्यावर कागदपत्रांची पडताळणी होऊ शकते...

 साधारणपणे गरजेपुरते बदल होऊन अशीच प्रक्रिया यापुढील टप्प्यांमध्ये राबविली जाईल... 

अधिक माहितीसाठी 27.02.2017 चा शासन निर्णय व मा.प्रदीप भोसले सर NIC पुणे यांच्या वेळोवेळी Updates देणा-या सरल सूचनांचे अवलोकन करावे...

3 comments:

  1. सर,माझी संगणिकीय पद्धतीने बदली झाली नाही माझी सलग सेवा २० वर्ष झाली आहे परंतु माझी सध्याच्या शाळेवर ३वर्ष पुर्ण झाले नाही मी परभणी जिल्हा मध्ये कार्यरत आहे मग नविन जी. आर.नुसार मी बदली पात्र आहे की नाही

    ReplyDelete
  2. बदली प्रक्रिया कधी चालू होईल सर

    ReplyDelete
  3. सर बदली प्रक्रियेत आगोदर कोणत्या बदल्या होतात आंतरजिल्हा की जिल्हा अंतर्गत

    ReplyDelete