Pages

सुस्वागतम...सुस्वागतम...सुवागातम...

गुरुपौर्णिमा

✒गुरुपौर्णिमा✒
आषाढ पौर्णिमेस गुरुपौर्णिमा किंवा 'व्यासपौर्णिमा' असे म्हणतात. या दिवशी व्यासपूजा करण्याची प्रथा आहे. महर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार होत. भारतीय संस्कृतीची मूळ संकल्पना आणि पुढची जोपासना व्यासांनीच केली आहे. व्यासांनी वेदांचे नीटपणे विभाजन आणि संपादन केले. पूर्वी वेद एकच होता, त्याचे चार भाग व्यासांनी केले. व्यासांनी महाभारत लिहिले महाभारत हा जगातील सर्वश्रेष्ठ व अलौकिक ग्रंथ! महाभारतात धर्मशास्त्रआहे, नीतिशास्त्र आहे, व्यवहारशास्त्र आहे आणि मानसशास्त्रही आहे. महाभारताची रचना करणारे व्यास त्या कथेशी फार जवळून संबंधित होते.
गुरुपौर्णिमेनिमित्त तन, मन आणि धन अर्पण केल्यास ते गुरुचरणांपर्यंत पोहोचते. गुरुपौर्णिमा आहे. त्यानिमित्त गुरूंना आजच मन पूर्णतः अर्पण करा. तुमचे इतरांशी जुळते कि नाही ? जुळत नसेल, तर ते आजच जुळवून घ्या.

💠 गुरुपौर्णिमा कविता 💠

जमलोय सर्व आज, पौर्णिमेला

वंदन आमुचे गुरुजनांना !!


आयुष्याच्या या टप्प्यावर, मी भक्कम उभा

कारण धरला होता, तुम्ही हात आमचा


एक उनाड-अजाण, होतो बच्चे आम्ही

घडलो सुजाण, तुमच्या आशीर्वादांनी


केली सुरुवात, हातचा वजाबाकींनी

हिशोब चुकतो, आयुष्याच्या घडामोडींनी


नव्हती ठाऊक तेव्हा, उत्तरं प्रश्नांची

दिल्या कित्येक परीक्षा, जेव्हा खेळलो जीवनाशी


होता तुमचा हात, आमच्या पाठीवरी

म्हणूनच जिंकलो आम्ही, कसोटी प्रसंगांची


~ पल्लवी कुंभार 🖋🖋🖋


🌞 गुरु मंत्र 🌞
गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा


गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य

गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती

गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य

गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक

आजपर्यंत कळत - नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन



⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜

हर प्रकार से नादान थे तुम,


गीली मिट्टी के समान थे तुम।

आकार देकर तुम्हें घड़ा बना दिया,

अपने पैरों पर खड़ा कर दिया।


गुरु बिना ज्ञान कहां,

उसके ज्ञान का आदि न अंत यहां।

गुरु ने दी शिक्षा जहां,

उठी शिष्टाचार की मूरत वहां।


अपने संसार से तुम्हारा परिचय कराया,

उसने तुम्हें भले-बुरे का आभास कराया।

अथाह संसार में तुम्हें अस्तित्व दिलाया,

दोष निकालकर सुदृढ़ व्यक्तित्व बनाया।


अपनी शिक्षा के तेज से,

तुम्हें आभा मंडित कर दिया।

अपने ज्ञान के वेग से,

तुम्हारे उपवन को पुष्पित कर दिया।


जिसने बनाया तुम्हें ईश्वर,

गुरु का करो सदा आदर।

जिसमें स्वयं है परमेश्वर,


उस गुरु को मेरा प्रणाम सादर।


सौजन्य से - साभार- छोटी-सी उमर (कविता संग्रह)

आपण कोणाचे तरी शिष्य आहोत, या भावनेत एक कृतज्ञता वाटते. भारतीय गुरुपरंपरेत गुरु-शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. जनक-याज्ञवल्क्य, शुक्राचार्य-जनक, कृष्ण, सुदामा-सांदिपनी, विश्वामित्र-राम, लक्ष्मण, परशुराम-कर्ण, द्रोणाचार्य-अर्जुन अशी गुरु-शिष्य परंपरा आहे. मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की, सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही.


भगवान श्रीकृष्णांनी गुरूच्या घरी लाकडे वाहिली. संत ज्ञानेश्वरांनी वडीलबंधू निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरु मानले, तर संत नामदेव साक्षात विठ्ठलाशी भाष्य करीत असत. त्या नामदेवांचे गुरु होते विसोबा खेचर. भारतीय संस्कृतीत गुरूला नेहमीच पूजनीय मानले आहे.


गुरूंच्या उपकारांनी आपले मन कृतज्ञतेने भरून येते, तेव्हा आपल्या तोंडून श्लोक बाहेर पडतो –

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ll
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ll


अनेक विद्यालयांतून, महाविद्यालयांतून श्रद्धाशील विद्यार्थी आपापल्या गुरुजनांसमोर या दिवशी विनम्र भावनेने नतमस्तक होतात.

                गुरुपौर्णिमा सुत्रसंचालन




गुरुपौर्णिमा महत्त्व 




गुरूपूजन 





No comments:

Post a Comment