Pages

सुस्वागतम...सुस्वागतम...सुवागातम...

आदर्श परिपाठ

राष्ट्रगीत
प्रतिज्ञा
संविधान
प्रार्थना
स्फुर्तिगीत
सुविचार
दिनविशेष
बोधकथा
पसायदान


वरील अक्षरांवर टिचकी मारा.

परिपाठ सुत्रसंचालन 
                                    (नमुना १)

"ढगातील  पावसाची पडते,
     धरणीशी गाठ.
अशा या सुंदर समयी,
सादर करत आहोत आम्ही परिपाठ"



१) *सुविचार*:-
माणुसकी खूप कमी होत चाललीय. ती फक्त जपायला शिका. इतिहास सांगतो काल सुख होत.
विज्ञान सांगते उद्या सुख असेल.
पण माणुसकी सांगते, जर मनात चांगल्या विचारांची साठवण असेल तर दररोज सुख असते.
आणि म्हणून आजचा सुविचार घेऊन येत आहे.......

२) *बातम्या*:-
आपल्या शिक्षकांची  आणि आपल्या पालकांची आपल्याकडून खूप मोठी स्वप्ने असतात. आणि ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आजच्या आधुनिक युगातील घटना आपल्याला माहित पाहिजे म्हणून आजचे बातमी पत्र घेऊन येत आहे....

३) *दिनविशेष*:-
आयुष्यात उगवणारा प्रत्येक दिवस हा नवी उमेद घेऊन  येत असतो.आणि या प्रत्येक दिवसाचे विशेष महत्व आपल्याला माहित असणे गरजेचे असते. म्हणून आजच्या दिवसाचे विशेष महत्व सांगण्यासाठी आजचे दिनविशेष घेऊन येत आहे........

४) *बोधकथा*:-
सर्व काही मनासारखं होत नाही,पण मनासारखं झालेलं विसरू नका. आणि अशा या जीवनात वेळोवेळी कठीण प्रसंग हे येणारच पण कठीण प्रसंगी आपल्याला योग्य बोध घेऊन यशाचे शिखर गाठायचे आहे. म्हणून बोध देणारी बोधकथा घेऊन येत आहे......

५) *सामान्य ज्ञान प्रश्न* :-
आपल्याला खूप काही प्रश्न पडत असतात. काही सामाजिक,आर्थिक ,वैज्ञानिक,
शैक्षणिक वगैरे. आम्हालाही काही प्रश्न पडलेले आहेत. बघू तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे येतात का म्हणून आजचे प्रश्न घेऊन येत आहे...

६) *कोडे* :-
आपलं आयुष्य हे   कोड्याप्रमाणेच असतं. थोडं कठीण,थोडं सोप तर थोडं मजेदार... आजचे कोडे हे आयुष्यासारखेच आहे. थोडे कठीण, थोडं सोप तर थोडं मजेदार म्हणून आजचे कोडे घेऊन येत आहे ......

७) *संवाद(इंग्रजी)*:-
आपल्याला इतर विषयाबरोबरच इंग्रजी विषयही सोपा वाटावा. म्हणून इंग्रजी विषयाचा पाया भक्कम होण्यासाठी आपल्याला इंग्रजी शब्दाबरोबर आपल्याला छोटे छोटे संवाद येणे गरजेचे आहे.म्हणून आजचे संवाद सादर करित आहे.इयत्ता .....चे ...... विद्यार्थी




     (नमुना २)
स्वागतम्  सुस्वागतम् सुस्वागतम्


फुल फुलत आहे, कळी उमलत आहे .
अशा या आनंदाच्या वातावरणात आमच्या परिपाठाला सुरवात होत आहे .

सागराला साथ असते पाण्याची
बागेला शोभा असते फुलांची
तसेच
आमच्या परिपाठाला साथ असते काही विद्यार्थ्याची ,


माझे नाव ..................... मी या परिपाठाचे सुत्रसंचलन करत आहे.


सु म्हणजे सुंदर विचार असाच एक नवीन सुविचार सांगत आहे .................


आपल्याला वार , दिनांक , शके यांची माहिती असणे अवश्यक असते , म्हणुन आजचे पंचांग सांगत आहे ...................


आपल्याला देशातील घडामोडिंची माहिती घेणे आवश्यक असते म्हणुन वार्तापत्र सांगत आहे  ......................


आपल्याला ज्यातून बोध होतो अशी एक बोधपर कथा सांगत आहे ......................


उन्हात चालण्यासाठी सावलीची गरज असते ,
अंधारात चालण्यासाठी उजेड हवा असतो. तसेच ज्ञानरूपी जीवन जगण्यासाठी ज्ञानाची गरज असते , म्हणून सामान्य ज्ञान घेत आहे ...................


प्रत्येक माहिती नवीन मुलगा सांगेन व त्याने त्याचे सांगितलेले काम केले की सुत्रसंचलन करणारा विद्यार्थी त्याचे नाव घेऊन धन्यवाद करीन.


वरील प्रमाणे आम्ही आमच्या शाळेचा परिपाठ घेतो.


इ.२ री चे लहान विद्यार्थी सुद्धा आता सुत्रसंचलन पाठ करुन पारिपाठ घेण्याचा प्रयत्न करत आहे.



धन्यवाद..

सौजन्य ;- सुत्रसंचालन ग्रुप

                  परिपाठ सूत्रसंचालन
       (नमुना ३)
 "संस्कार शाळा आहे ज्ञानाची लाट
इथेच मिळते यशाच्या शिखराची वाट,
       अशा या सुंदर शाळेत नेहमी सादर होतो परिपाठ.

    म्हणून आज आम्ही इयत्ता......वी मुले/मुली परिपाठ सादर करणार आहोत तरी तुम्ही आमचा परिपाठ शांत चित्तेने एकून घ्यावा हि नम्र विनंती.

१)सुविचार:-कासवाच्या गतीने का होईना रोज थोडी थोडी प्रगती करा.वाटेत खूप ससे आडवे येतील बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.आणि जर तुमची श्रीमंती तुम्हाला मोजायची असेल तर नोटा मोजू नका चुकून कधी डोळ्यातून दोन अश्रू आले तर ते पुसायला कितीजण येतात ते मोजा म्हणून कासवाच्या गतीनं का होईना थोडी थोडी प्रगती करा आणि प्रगती करण्यासाठी आपल्याकडं चांगले व सुंदर आचार विचार असणे गरजेचे आहे.म्हणून आजचा चांगला विचार म्हणजे सुविचार सांगण्यासाठी येत आहे......

२)दिनविशेष:-नवीन दिवस नव्या उम्मेदी जरा शोधूया.नवीन वाटा प्रकाशाकडे वाटचाल अन अंधाराच्या थोपवू लाटा.खरच येणारा दिवस कालच्या पेक्षा अधिक आनंदाने,उत्साहाने आणि चांगल्या दृष्टीकोण जगायचा असतो आजचा दिवस हि असाच आहे.म्हणून आजच्या दिवसाचे महत्व दिनविशेषातून सांगण्यासाठी दिनविशेष घेऊन येत आहे......

३)बातम्या:-मित्रहो असा प्रश्न पडत नाही का? कि बातम्यांना इंग्रजीमध्ये NEW,S असे का म्हणतात? कारण N-म्हणजे नॉर्थ,E-म्हणजे ईस्ट,W-म्हणजे वेस्ट व S-म्हणजे साऊथ अशा जगातील चार दिशातील कानाकोपऱ्यातील घडामोडी आपल्याला कळतात म्हणून त्याला NEW,S असे म्हणतात. म्हणून आजचे न्युज म्हणजे बातमीपत्र घेऊन येत आहे........

४)बोधकथा:-खूप काही शिकून जाते जाता जाता म्हणून रोज ऐकायची असते एक छोटीशी बोधकथा म्हणून आजची बोध कथा सांगण्यासाठी येत आहे......


५) प्रश्न:-  प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अन तसेच का शिकणे कधी संपत नाही होऊ दे लाख चूका खरंच माणूस हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो.अन आयुष्यभर विद्यार्थी म्हटल्यावर प्रश्न हे पडणारच तसेच आम्हाला हि काही प्रश्न पडले आहेत बघूया तुम्हाला त्याची उत्तरे येतात का?म्हणून आजचे प्रश्न घेऊन येत आहे......

६)कोडे:- छोट्या या आयुष्यात खूप काही हवं असतं पण पाहिजे तेच मिळत नसत.असंख्य चांदण्यांनी भरूनही आपलं आभाळ मात्र रिकामं असतं.हव्या असलेल्या सगळ्याच गोष्टी माणसाला मिळत नसतात.पण नमिळणाऱ्या गोष्टीच का माणसाला हव्या असतात?म्हणून म्हणतात जीवन एक खेळ नव्हे,फुकट मिळालेला वेळ नव्हे जीवन एक कोडे आहे.सोडवला तितके थोडे आहे.म्हणून जीवनासारखे एक मजेदार कोडे घेऊन येत आहे.....

७)इंग्रजी संवाद:- इंग्रजी भाषा हि आंतरराष्ट्रीय भाषा आहे.त्याचा पाया मजबूत होण्यासाठी शब्दार्था बरोबर छोटे छोटे संवाद येणे गरजेचे आहे म्हणून आजचा इंग्रजी संवाद घेऊन येत आहे.......

शेवटी जात जात एवढंच म्हणेन

"किती क्षणाच हे आयुष्य असतं
आज असतं तर उद्या नसतं
म्हणून ते हसत हसत जगायचं असतं .कारण येणारे दिवस येत असतात, जाणारे दिवस जात असतात,येणाऱ्यांना घडवायच असतं, जाणाऱ्यांना जपायच असतं
अन आयुष्याच गणित सोडवायच असतं, म्हणूनच कधीतरी कोणासाठी तरी जगायच असतं"

   🌹🌹संकलन🌹🌹
🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤
     राजेंद्र भाऊराव देशमुख
संस्कार वि.मं. शिये,कोल्हापूर
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻


            आदर्श  परिपाठ संचलन*     
                      (नमुना ४)
           
            *राष्ट्रगीत*
           सावधान, विश्राम
सर्व लोकांच्या अंतःकरणाचा स्वामी
  आणि भारताचा भाग्यविधाता
  अशा राष्ट्रगीताची गाऊ गाथा
  गाऊनी राष्ट्रगीता,गाऊनी राष्ट्रगीता
                सावधान
   एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे
                शुरू कर.

             *राष्ट्रवंदना*
  राष्ट्र माझी माता राष्ट्र माझा पिता
  राष्ट्र गुरू आणि राष्ट्र माझा दाता
        या राष्ट्रा करूया वंदन
    तोडूनी साऱ्या धर्मांचे बंधन
  एकसाथ राष्ट्रवंदना शुरू करेंगे
             शुरू कर

                *प्रतिज्ञा*
            देशा विषयी प्रेम
          मोठ्यां विषयी आदर     
         करून घेऊ बंधुभाव
           व कर्तव्याची जान
          उजळू सर्वांची प्रज्ञा
      घेऊन प्रतिज्ञा,घेऊन प्रतिज्ञा
      एकसाथ प्रतिज्ञा शुरू करेंगे
                    शुरू कर

              *संविधान*
 लोकशाही गणराज्याचे गाऊ गान
      घेऊनी भारताचे संविधान
      घेऊनी भारताचे संविधान
    एकसाथ संविधान शुरू करेंगे
                शुरू कर

         *स्वच्छतेची प्रतिज्ञा*
        तन-मनास देण्यास आज्ञा
     घेऊया सारे स्वच्छतेची प्रतिज्ञा   
       एकसाथ स्वच्छतेची प्रतिज्ञा   
           शुरू करेंगे शुरू कर


*एकसाथ निचे बैठेंगे निचे बैठ*

              *प्रार्थना गीत*
     साने गुरुजींनी दिले सर्वांना ज्ञान
         त्यांचे रचित गाऊया गान
         त्यांचे रचित गाऊया गान
      एकसाथ खरा तो एकची धर्म
             शुरू करेंगे शुरू कर       

             *स्फूर्ती गीत*
          राह पे चलते वक्त   
         मुसिबते तो आयेगी
        स्फुर्तीगीतोंसे वों कंही
         दूर भाग जायेगी
  एकसाथ स्फुर्तीगीत शुरू करेंगे
             शुरू कर

            *सुविचार*
    सांगून सर्वांना थोरांचे विचार
     रुजवू विचारातून संस्कार
  सांगून सुविचार,सांगून सुविचार
 सुविचार सांगण्यासाठी येत आहे
             *--------------*

            *दिनविशेष*
    कधी सोनेरी, कधी काळा
        दिवस असतो विशेष 
         *---------------*
           घेऊन येत आहे   
        आजचा दिनविशेष

             *बातम्या*
      काय घडले जगात           
      काय घडले देशात
         जाणून घेऊया
      आजच्या बातम्यात
बातम्या सांगण्यासाठी येत आहे
            *-------------*

         *सामान्य ज्ञान*
  सागरा समान विस्तृत ज्ञाना
     थेंब थेंब मी वेचून घेतो
  सामान्य ज्ञानातून मिञा
 मोती होवून चमकून जातो
 सामान्य ज्ञान सांगण्यासाठी
                येत आहे
           *--------------*

             *बोधकथा*
        संस्काराशी नाते जडे           
        बोधकथेतून घेऊ धडे
 बोधकथा सांगण्यासाठी येत आहे
            *------------------

            *पसायदान*
  समाज उद्धरण्या मागीतले दान
         ज्ञानेश्वरांचे पसायदान
  एकसाथ पसायदान शुरू करेंगे
              शुरू कर


👫  👫  👫 👫  👫  👫  👫
धन्यवाद....
सौजन्य ;- सुत्रसंचालन ग्रुप....

4 comments: