Pages

सुस्वागतम...सुस्वागतम...सुवागातम...

Monday 5 November 2018

*🕯|| शुभ दिपावली ||🕯*

*🕯|| शुभ दिपावली ||🕯*

उद्या पासून दीपावली ला सुरुवात होत आहे.
सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा....  !!!!!
*4 Nov. 2018 वसुबारस !*
गाय आणि वासारच्या अंगी असणारी उदारता,
प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास
लाभो !
*5 Nov. 2018 धनत्रयोदशी !*
धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत !
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !
*6 Nov. 2018 नरकचतुर्दशी !*
सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा !
अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ
आपल्याला लाभो !!
आपल्याकडून नेहमी सत्कर्म
घडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !!
*7 Nov. 2018 लक्ष्मीपूजन !*
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा !
नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त
होवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्य
आपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न !
*8 Nov. 2018 पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !*
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव
गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे
आशीर्वाद आपल्याला मिळत राहो !
*9 Nov. 2018 भाऊबीज !*
जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट
राहू दे !
*ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास*
*आंनदाची आणि भरभराटिची जाओ..*
        *🕯|| शुभ दीपावली ||🕯*

Monday 1 October 2018

*समजुन घ्या*
*स्टाफ आय डी आणि शालार्थ आयडी*

स्टाफ आयडी : हा स्टाफ आयडी म्हणजे सरल मधील स्टाफ पोर्टलवर आसलेला सात अंकी आयडी आसतो . तो आपल्या बदली फॉर्मवर सुद्धा  आपल्या नावासमोर  कंसामध्ये आसतो .
उपलब्ध नसेल तर खालीलप्रमाणे शोधावा .

www.education.maharashtra.gov.in


Staff portal
शाळेचा आयडी पासवर्ड टाकुन ओपन करावे .


Staff portal


Teaching Details


Salect staff name


submit


personal details


Basic and Current Details


Staff id
--------------------------------------------------

शालार्थ आयडी : शालार्थ आयडी  हा आपल्या पगार बिलाच्या प्रिंटवर आसतो हा आयडी O2DED ने सुरुवात होतो .
--------------------------------------------------

सध्या दोन कामे  चालु आहेत .
१) सेवाज्येष्ठता यादी तयार करणे (तीन पानी फॉर्म )  : यामध्ये स्टाफ आयडी विचारलेला आहे तो बदलीच्या फॉर्म वर आपल्या नावासमोर कंसामध्ये दिसत आसलेला आयडी लिहावा जर फॉर्म उपलब्ध नसेल तर सरल मधील स्टाफ पोर्टलवरुन घ्यावा व लिहावा हा आयडी प्रत्येकाचा वेगळा आसतो .

२) ईसर्व्हिसबुक रजिस्ट्रेशन फॉर्म (एक पानी फॉर्म इंग्रजीमधुन ) : या फॉर्म वर सर्वात शेवटी Sevarth /शालार्थ आयडी विचारला आहे तो आयडी आपल्या पगारबिलावर आसलेला O2DED पासुन सुरुवात होणारा आयडी लिहावा .
🌼🌻🌼🌻🌼🌻🌼🌻🌼🌻🌼
हे दोनही आयडी नेहमी जतन करुन ठेवावेत .
🥀🍁🥀🍁🥀🍁🥀🍁🥀🍁🥀

Tuesday 7 August 2018

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी सन २०१७-१८

🌟💎🌟💎💎🌟💎🌟💎🌟💎
शिष्यवृत्ती परिक्षा इयत्ता पाचवी   जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिन्हेवाडी चे दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत*
❎🌐❎🌐❎🌐❎🌐❎🌐❎


*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा   तिन्हेवाडी क्र,२*
*सांडभोरवाडी,ता.खेड,जि.पुणे. या शाळेने  शिष्यवृत्ती ची परंपरा यावर्षीही कायम ठेवली आहे.याशाळेतील
*दोन विद्यार्थीनी*
*कु.वैष्णवी बाळासाहेब आरूडे*
*कु.संस्कृती संपत सांडभोर* 
 यांची अंतिम गुणवत्ता यादीत निवड झाली आहे.या विद्यार्थ्यांना 
*सौ.रेखा देविदास नेहरे  मँडम,सौ.संजिवनी चिखले मँडम*
*मुख्याध्यापक ;- श्री.ईश्वर फदाले सर*  आणि शिक्षकवृंद यांनी मार्गदर्शन केले.
त्याबद्दल केंद्रप्रमुख तथा विस्तारअधिकारी *मा.संजीव टेंभे सर* आणि *मा.केंद्रप्रमुख एकनाथ लांघी सर* जि.प.शाळा तिन्हेवाडी क्र.२ चे
शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष *मा.रंगनाथशेठ दिनकर आरुडे*
उपाध्यक्ष *मा.सौ.मंगलताई उदयबापू पाचारणे*, जि.प.शाळा तिन्हेवाडी क्र.१ मुख्याध्यापिका *मा.श्रीम.सुनंदा पाटोळे मँडम* व सर्व शिक्षकवृंद, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष *मा.रंगनाथशेठ भिकाजी आरुडे*, उपाध्यक्ष *मा.अविनाशभाऊ सांडभोर*  आणि सर्व शा.व्य.स सदस्य तसेच समस्थ ग्रामस्थ
यांनी शाल ,श्रीफळ पुष्पगुच्छ व खाऊ देवून सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले.
👏🏻👏🏻👏🏻💐💐💐💐



Friday 22 June 2018

आधार माहिती

आपली आधार कार्ड माहिती जाणून घ्या.
१) आधार स्थिती
२) आधार डाऊनलोड
३) 

Friday 15 June 2018

शाळा प्रवेश अर्ज तिन्हेवाडी क्र.१,(सांडभोरवाडी) ता.खेड,जिल्हा-पुणे.

 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬

शाळा प्रवेश अर्ज तिन्हेवाडी क्र.१,(सांडभोरवाडी) ता.खेड,जिल्हा-पुणे.
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬

शाळा प्रवेश अर्ज 
↟↟↟↟↟↟↟↟↟↟↟↟↟↟↟↟

वरील अक्षरांवर क्लिक करा ...

धन्यवाद....

Thursday 7 June 2018

बाप्पा मोरया

                       
                        
                                 गुपीतबाबा महोत्सव निम्मित पानमळा , राजगुरुनगर, दि. ६ फेब्रुवारी २०१८ सांस्कृतिक कार्यक्रम ,बाप्पा मोरया गीत सादरकर्ते जिल्हा परिषद शाळा तिन्हेवाडी, ता.खेड, जिल्हा पुणे  चे विद्यार्थी

Tuesday 5 June 2018

दहावी निकाल सन २०१८

शुक्रवार ८ जून २०१८ रोजी दहावी निकाल (सन २०१८ )

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या  परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे.शुक्रवार  ८ जून रोजी बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल जाहीर होईल.

सकाळी 11 वा. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, दुपारी 1 पासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येतील. बोर्डाने विविध संकेतस्थळावर निकाल पाहण्याची सोय केली आहे.

कुठे पाहाल निकाल?
http://mahresult.nic.in/या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना त्यांचा सविस्तर निकाल पाहायला मिळेल. या निकालाकडे राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

निकाल पाहण्यासाठी इतर वेबसाईट :

1. www.mahresult.nic.in
2. www.result.mkcl.org
3. www.maharashtraeducation.com
4. www.rediff.com/exams
5.
http://maharashtra12.jagranjosh.com
कसा पाहाल निकाल?
दहावीचा निकाल पाहाण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहावी लागतील.

समजा तुमचा नंबर M123456 असा आहे आणि तुमच्या आईचं नाव कुसूम आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात M123456 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये KUS असं लिहावं लागेल.

ज्या विद्यार्थ्यांना इंटरनेटवर निकाल पहाता येणार नाही.त्यांनी खाली दिलेल्या फोन  नंबरवर आपला आसन क्रमांक व आईचे नाव एस.एम एस द्वारे किंवा whatsup द्वारे पाठवा.आपला निकाल मोफत पाहिला जाईल.
      संपर्क ;-
       श्री.बाळासाहेब बारवेकर
       फोन.नं.९५२७९८३७४९
        धन्यवाद ....

मोफत प्रवेश ...सन २०१८-१९

जि.प.शाळा तिन्हेवाडी नं.१ व २ , ता.खेड, जिल्हा पुणे.
                 प्रवेश घ्या  📚

        सुवर्ण संधीचा लाभ घ्या.

          🙏🙏🙏🙏🙏🙏
       तमाम पालक वर्गाना नम्र विनंती आहे.
        🙏🙏🙏💥💥💥💥



    चालु शैक्षणिक वर्षात (सन २०१८-१९) इयत्ता १ ली ते ७ वी करीता आपल्या पाल्याना जिल्हा परिषद शाळेतच प्रवेश देऊन विद्यार्थ्यांची बौद्धिक ,शारीरिक व सामाजिक ज्ञानाची जय्यत तयारी करुन घ्या.

  शासनाच्या अनेक मोफत अनेक योजना व अध्यापनास साजेसा डिजिटल क्लास आणि सामान्य ज्ञानाची भरपूर माहितीही आपल्याच गावातील जि.प.शाळेतुन मिळत आहे.

   उगाच एकाच बघुन एक चालूच असलेल्या खाजगी शिकवणीच्या बाजारीकरणास ठकुन न जाता प्रत्येक पालकानी स्वतःच्या मुलाना दररोज एक तास वेळ देऊन दररोजचा गृहपाठ करुन घेतल की, मग कोणत्याही शिकवणीची आवश्यकता नाही.


📚🖊 जि.प.शाळेत मोफत मिळणाऱ्या योजना पहा.
१)मोफत प्रवेश.
२)दोन गणवेश.
३)पहिल्याच दिवशी पाठयपुस्तके.
४)उपचारात्मक वर्ग.
५)अवांतर वाचनासाठी वाचनालय.
६)आनंददायी शिक्षण .
७)सांस्कृतिक कार्यक्रम .
८)डिजीटल क्लासरुम.
९)सर्व शिष्यवृती योजनाचा लाभ.
१०)मध्यान भोजन.
११)पिण्यासाठी स्वच्छ पाणी.
१२)खेळाचे भरपुर साहित्य .
१३)अनुभवी शिक्षक .
१४)पालक मेळावे.
१५)संगणक ज्ञान.
१६)सुसज्ज इमारत.
१७)बसण्यासाठी डेस्क बेंच.
१८)ज्ञानरचनावाद.
१९)शैक्षणिक सहल.
२०)स्नेहसंम्मेलन.
२१)शालेय आरोग्य तपासणी.
२२) ABL साहित्याद्वारे शिक्षण.
२३) क्षेत्रभेट
२४) सुसज्ज व आधुनिक ई - वाचनालय
२५) प्रयोगशाळा
२६) विद्यार्थी बचत बँक व ग्राहक भांडार
२७) मूल्यशिक्षणाची रुजवणूक



अशा अनेक योजना विनामुल्य मिळण्याकरीता आपल्याच गावातील जिल्हा परिषद शाळेत आपल्या मुलांचे प्रवेश निश्चित करा......
...............................

.

खालील गीत ऐका...विचार करा. 

             जिल्हा परिषद शाळा प्रवेश गीत
                    यावर क्लिक करा.

                सुवर्ण संधी

🖊🖊शाळा शुभारंभ🖍🖌
-दिनांक १५/जुन/२०१८

आपले नम्र मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापन समिती तिन्हेवाडी १ व २ 

Tuesday 29 May 2018

३० मे रोजी बारावी निकाल (सन २०१८ )

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. आज (30 मे) रोजी बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल जाहीर होईल.

सकाळी 11 वाजता बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, दुपारी 1 पासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येतील. बोर्डाने विविध संकेतस्थळावर निकाल पाहण्याची सोय केली आहे.

कुठे पाहाल निकाल?
http://mahresult.nic.in/या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना त्यांचा सविस्तर निकाल पाहायला मिळेल. या निकालाकडे राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

निकाल पाहण्यासाठी इतर वेबसाईट :

1. www.mahresult.nic.in
2. www.result.mkcl.org
3. www.maharashtraeducation.com
4. www.rediff.com/exams
5.
http://maharashtra12.jagranjosh.com
कसा पाहाल निकाल?

बारावीचा निकाल पाहाण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहावी लागतील.

समजा तुमचा नंबर M123456 असा आहे आणि तुमच्या आईचं नाव सोनाली आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात M123456 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये SON असं लिहावं लागेल.

www.shikshansanjivani.com