Pages

सुस्वागतम...सुस्वागतम...सुवागातम...

आपल्या शाळेची वेबसाईड पहा

आपल्या शाळेची वेबसाईड पहा
         आपल्या शाळेचे संकेतस्थळ
       
https://education.maharashtra.gov.in/saral/ U-dise क्रमांक                                                                                                            


मित्रहो, आपल्या शाळेचे संकेतस्थळ स्थळ तयार झालेले आहे
जसे इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे स्वतःचे संकेतस्थळ असते तसे अगदी पण  मोफत...
चला तर  मग जावूया आपल्या शाळेच्या संकेतस्थळावर
 www.education.maharashtra.gov.in 
या साईट वर
School पोर्टल वर click करा

आपल्या समोर पाच विविध पोर्टल असणारी एक विंडो असेल त्याचा वरील भागात  सातव्या क्रमांकाचे ऑप्शन आहे School Website त्याच्यावर click करा

शाळेचा UDISE क्रमांक टाकून View school Website  वर click करा, आपल्या समोर आपल्या शाळेचे संकेतस्थळ अथवा ज्या शाळेचे udise क्रमांक टाकू त्या शाळेचे संकेतस्थळ खुले होणार आहे

 
सदर संकेतस्थळावर school पोर्टल वर जी माहिती भरली आहे ती सर्वांना पाहण्यासाठी खुली असणार आहे

 About us , our staff , Students Performance , Achievements ,  Photo  Gallery ,Address ,  contact us , Feedback  ,Notice board , Our moto ,  vision , School Report card

 आपण भरलेली school पोर्टल वरील सर्व माहिती , शाळेच्या बातम्या , आपले   उपक्रम , विविध सभांचे इतिवृत्त , स्पर्धा परीक्षा उपक्रम

 वरील सर्व माहिती सर्वांना पाहता येणार आहे

 मग त्यासाठी शाळेचा वेगळा ब्लॉग, वेगळी website कशाला , आपल्या शाळेची विविध माहिती मोफत प्रसिद्ध करू शकतो

 मग आपली माहिती नेहमीच अपडेट असायला हवी त्यासाठी आपल्याला लॉगीन ची सोय सुद्धा त्याच पेज वर दिलेली आहे

 आपण पहिल्यांदा लॉगीन वर click करा

आपल्या शाळेचा युजर id , पासवर्ड व captcha कोड टाकून लॉगीन करा, आपल्या समोर एकूण अठरा tab दिसतील ते अपडेट ठेवावे लागणार आहेत व जी माहिती भराल ती माहिती भरल्या नंतर submit बटनावर click करायचे आहे

      Home

हा  मुख्यपृष्ठ  असणार आहे

       
Notice Board
   
ह्या मध्ये शालेय कामकाजा बद्दल विविध सूचना द्यायच्या आहेत

      
Recent News
     आपल्या शाळेत जेजे Events झाले त्याची माहिती प्रसिद्ध करा. कोणत्या तारखे पर्यंत ती दिसली पाहिजे ते सेट करा . या शिवाय या बातम्यामध्ये विविध pdf files , फोटो सुद्धा प्रसिद्ध करू शकतो

       Quotes
       
एखाद्याचे चांगले म्हणणे , चांगले वाक्य लिहा, त्याचे नाव लिहा , किती तारखे पर्यत ते दिसले पाहिजे ते सेट करा

 
        Activities for Society
     
 समाजसेवा उपक्रम लिहा, कोणत्या तारखेला हा उपक्रम राबविला ते लिहा. त्यासाठी आपण विविध  फोटो , pdf files सुद्धा प्रसिद्ध करू शकतो

     
    Photos
  आपल्या शाळेत विविध कार्यक्रम , उपक्रम राबिवले जातात त्याचे आपण फोटो काढून प्रसिद्ध करू शकतो*
*
फोटोचे शीर्षक, फोटो कशा बाबतीत आहेत ते कोणत्या तारखे पर्यत दिसले पाहिजेत ते सेट करा. फोटो अपलोड करा*

       Meeting Proceeding
       
आपल्या शाळेत विविध समित्यांच्या बैठका होत असतात, आपण त्यांचे इतिवृत्त लिहितो तो येथे प्रसिद्ध करा. समितीचे नाव, सभेचा तपशील , सभेची तारीख, या संबधी pdf files word files अपलोड करा

           
शैक्षणिक वर्ष, कमिटीचे नाव, सभांची संख्या निवडून सभेचा सारांश लिहा

       Send SMS
           
शालेय समितीची बैठक असेल किंवा विविध उपक्रम राबवायचे असतील त्या संबधी माहिती आपल्याला समितीच्या विविध सदस्यांना द्यायची असेल तर या मध्ये आपण समिती निवडा, SMS चा मजकूर type करा , submit वर click केल्यावर तो मेसेज सर्व समितीच्या सदस्यांना जाईल
   
 हे नावे व मोबईल क्रमांक आपण school पोर्टलवर माहिती भारतावेळी सेव केलेले असतात

          Prospectus
       
  आपल्या शाळेचे माहितीपत्रक येथे अपलोड करायचेआहे. माहितीपत्राकाचा तपशील , कोणत्या तारखे पर्यत वैध ते लिहायचे आहे

         Achievements
                   
 आपल्या शाळेने काय काय साध्य, संपादन केलेले आहे त्याचा तपशील येथे नमूद करायचा आहे

         Vision and Mission
             
आपल्या शाळेचे ध्येय नमूद करायचे आहे

        Exams
  School Exams -   *याच्या मध्ये शालेय परीक्षेचे वेळापत्रक, अभ्यासक्रम अपलोड करायचा आहे, परीक्षेचा प्रकार, कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यत, इयत्ता हे नमूद करायचे आहे
  Competitive Exams -  
स्पर्धा परीक्षेचे नाव, कोण आयोजित करणार आहे, कोणत्या तारखे पासून कोणत्या तारखे पर्यत ते नमूद करावे

       Emergency Contact  
                 
दवाखाना, पोलीस स्टेशन, अग्निशमन दल , सल्लागार, रक्तपेढी यांचे आपत्कालीन फोन नंबर नमूद करायचे आहेत

      HM information  
  याच्या मध्ये शाळेचा लोगो, मुख्याध्यापकांचा फोटो , मुख्याध्यापक प्रोफाईल , संकेतस्थळ थीम रंग , संकेतस्थळ भाषा नमूद करायचे आहे

     Subject Thought –

               
आपल्या शाळेत कोणकोणते विषय शिकवले जातात ते नमूद करा.

      Time table -
         
आपल्या शाळेचे इयत्ता व तुकडीनिहाय शिकवण्याच्या तासिकांचे वेळापत्रक भरायचे आहे

         Calender
           
याच्या मध्ये शालेय सुट्ट्यांची यादी भरावयाची आहे

          Photos

     
 शालेय इमारत व क्रीडांगण याचे फोटो १ mb साईज पेक्षा कमी अपलोड करायचे आहे



  मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या शाळेचे संकेतस्थळ अपडेट करू शकतो व जगाला आपल्या शाळेची माहिती दाखवू शकतो
 ही माहिती आपण वेळोवेळी अपडेट करायला हवी

 आपल्या शाळेच्या संकेतस्थळाचा पत्ता खालीलप्रमाणे असेल https://education.maharashtra.gov.in/saral/ U-dise क्रमांक 

यास ईमेल करा हे ब्लॉग करा..
Twitter वर शेअर करा..
Facebook वर शेअर करा.....
  आपल्या शाळेची वेबसाईट बनव्यासाठी शुभेच्छा...

No comments:

Post a Comment