Pages

सुस्वागतम...सुस्वागतम...सुवागातम...

किशोर मासिक

                                                    किशोर मासिक   
बालभारतीच्या वतीने १४ नोव्हेंबर १९७१ पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांच्या जयंतीच्या दिवसापासून बालभारतीच्या वतीने किशोर हे मासिक सुरू करण्यात आले. वसंत शिरवाडकर हे किशोरचे पहिले संपादक होते. मराठीतील नामवंत लेखकांचे साहित्य किशोरच्या विविध अंकांतून प्रकाशित झाले आहे. तसेच नामवंत चित्रकारांनी किशोरच्या अंकांसाठी चित्रे काढली आहेत. किशोर मासिकातील सदरांपैकी माझे बालपणसुटीचे दिवसमाझा गावचित्रकथाफास्टर फेणे, देशोदेशींच्या कथा मुलांपर्यंत पोचवणारे देशांतर ही सदरे विशेष प्रसिद्ध आहेत. माझे बालपण ह्या सदरात यशवंतराव चव्हाण, लता मंगेशकर, विजय तेंडुलकर, सुनील गावसकर, जयंत नारळीकर ह्यांच्यापासून ते सचिन तेंडुलकर इत्यादी नामवंतांचे लेखन प्रकाशित झाले आहे.
किशोर हे ८ ते १४ ह्या वयोगटातील मुलांसाठी बालभारतीच्या वतीने चालवण्यात येणारे मासिक आहे. १९७१ पासून आजवर हे मासिक प्रसिद्ध होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळपुणे द्वारे प्रसिद्ध केले जाते. मुलांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी, अभ्यासक्रमाबाहेरचे ज्ञान मिळावे, त्यांच्या संवेदनशील मनावर उत्तम मूल्यांचे संस्कार व्हावेत ही ह्या मासिकाची उद्दिष्टे आहेत.किशोरवयीन शालेय विद्यार्थी हा वाचकवर्गाकरीता, त्यांच्या गरजा लक्षात घेऊन मासिकाची मांडणी केलेली आहे. मराठी किशोरवयीन मुलांमध्ये हे आवडीचे मासिक आहे
यामध्ये आपणास सन १९७१ पासून २०१७ पर्यंत ची मासिके उपलब्ध आहेत.



                                       

No comments:

Post a Comment