Pages

सुस्वागतम...सुस्वागतम...सुवागातम...

Saturday, 1 July 2017

पुणे जिल्हा सेवा जेष्ठता यादी 2017

पुणे जिल्हा सेवा जेष्ठता यादी 2017
जिल्हा अंतर्गत बदलीसाठी आवश्यक असणारी सेवा जेष्टता यादी डाउनलोड करण्यासाठी
येथे क्लिक करा.

पुणे जिल्हा रिक्त पदांची यादी २०१७

पुणे जिल्हा रिक्त पदांची यादी २०१७
डाउनलोड करण्यासाठी
 येथे क्लिक करा.

Tuesday, 27 June 2017

शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी इयत्ता ५ वी जि.प.प्राथमिक शाळा तिन्हेवाडी नं.१,ता,खेड,जि.पुणे.

शिष्यवृत्ती परीक्षा 2017 इयत्ता ५ वी
जि.प.प्राथमिक शाळा तिन्हेवाडी नं.१,ता,खेड,जि.पुणे.

🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷

गटशिक्षाधिकारी मा.सोपानराव वेताळ साहेब
केंद्रप्रमुख मा.वाडेकर मँडम (निवृत्त )
केंद्रप्रमुख मा.रेटवडे सर
यांच्या अनमोल मार्गदर्शनाने व सततच्या प्रयत्नाने......
.

🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀

शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी

🏆 सिद्धार्थ बाबाजी आरुडे
Merit Rank J- 0148/692

गुणपत्रिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

http://puppss.in/FinalPUPResult.aspx?SeatNo=M2108010008

🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼

🏆आशिष एकनाथ सांडभोर
Merit Rank J - 0614/692



गुणपत्रिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

http://puppss.in/FinalPUPResult.aspx?SeatNo=M2108010115
🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷
👉🏻पात्र विद्यार्थी👏🏻👏🏻👏🏻

⭐ तन्मय मधूकर दरेकर

⭐ तुषार नागेश गौड

⭐ गौरव शरद कोरडे

⭐ राम तानाजी राक्षे

⭐ आदित्य विकास सांडभोर

⭐ वेदांत ज्ञानेश्वर सांडभोर

⭐ करण संदिप तनपुरे

⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜

🕍💫मार्गदर्शक💫

🌟 श्री.बा.म.बारवेकर
वर्गशिक्षक इ.५ वी
🌟 श्रीम.सुनंदा भा.पाटोळे
मुख्याध्यापिका
🌟 सौ.आशा.सु.दाभाडे
पदवीधर शिक्षक
🌟 श्रीम.हेमा.रा.घोलप
उपशिक्षिका
🌟 श्रीम .कविता.म.बनकर
उपशिक्षिका
🥇🥈🥉🥇🥈🥉🥇🥈🥉🥇🥈

शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.रंगनाथ आरुडे
                व
सर्व शालेय व्यवस्थापन समिती सदस्य

💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫
मा.सरपंच सौ.कविता पाचारणे

सर्व ग्रामपंचायत सदस्य व शिक्षणप्रेमी ग्रामस्थ

🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

👏🏻💐👏🏻💐👏🏻💐👏🏻💐👏🏻💐👏🏻
सर्व गुणवान विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन व पुढील उज्ज्वल भविष्यास खूप खूप शुभेच्छा
⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜


Monday, 12 June 2017

मोफत प्रवेश ...मोफत प्रवेश ....

जि.प.शाळा तिन्हेवाडी नं.१ व २ , ता.खेड, जिल्हा पुणे.
                 प्रवेश घ्या  📚

        सुवर्ण संधीचा लाभ घ्या.

          🙏🙏🙏🙏🙏🙏
       तमाम पालक वर्गाना नम्र विनंती आहे.
        🙏🙏🙏💥💥💥💥



    चालु शैक्षणिक वर्षात इयत्ता १ ली ते ८ वी करीता आपल्या पाल्याना जिल्हापरिषद शाळेतच प्रवेश देऊन विद्यार्थ्यांची बौद्धिक ,शारीरिक व सामाजिक ज्ञानाची जय्यत तयारी करुन घ्या.

  शासनाच्या अनेक मोफत अनेक योजना व अध्यापनास साजेसा डिजिटलक्लास आणि सामान्य ज्ञानाची भरपूर माहीतीही आपल्याच गावातील जि.प.शाळेतुन मिळत आहे.

   उगाच एकाच बघुन एक चालूच असलेल्या खाजगी शिकवणीच्या बाजारीकरणास ठकुन न जाता प्रत्येक पालकानी स्वतःच्या मुलाना दररोज एक तास वेळ देऊन दररोजचा गृहपाठकरुन घेतल की मग कोणत्याही शिकवणीची आवश्यकता नाही.


📚🖊 जि.प.शाळेत मोफत मिळणाऱ्या योजना पहा.
१)मोफत प्रवेश.
२)दोन गणवेश.
३)पहील्याच दिवशी पाठयपुस्तके.
४)उपचारात्मक वर्ग.
५)अवांतर वाचनासाठी वाचनालय.
६)आनंददायी शिक्षण .
७)सांस्कृतिक कार्यक्रम .
८)डिजीटल क्लासरुम.
९)सर्व शिष्यवृती योजनाचा लाभ.
१०)मध्यान भोजन.
११)पिण्यासाठी स्वच्छ पाणी.
१२)खेळाचे भरपुर साहित्य .
१३)अनुभवी शिक्षक .
१४)पालक मेळावे.
१५)संगणक ज्ञान.
१६)सुसज्ज इमारत.
१७)बसण्यासाठी डेस्क बेंच.
१८)ज्ञानरचनावाद.
१९)शैक्षणिक सहल.
२०)स्नेहसंम्मेलन.
२१)शालेय आरोग्य तपासणी.
२२) ABL साहित्याद्वारे शिक्षण.
२३) क्षेत्रभेट
२४) सुसज्ज व आधुनिक इ - वाचनालय
२५) प्रयोगशाळा
२६) विद्यार्थी बचत बँक व ग्राहक भांडार
२७) मूल्यशिक्षणाची रुजवणूक



अशा अनेक योजना विनामुल्य मिळण्याकरीता आपल्याच गावातील जिल्हा परिषद शाळेत आपल्या मुलांचे प्रवेश निश्चित करा......
................................
                सुवर्ण संधी  

🖊🖊शाळा शुभारंभ🖍🖌
-दिनांक 15/जुन/२०१७

आपले नम्र मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापन समिती तिन्हेवाडी १ व २ 
 

Saturday, 10 June 2017

१3 जूनला दहावीचा निकाल

१3 जूनला दहावीचा निकाल
  दहावी निकाल, महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ


अखेर दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 12 - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी / मार्च 2017मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा आॅनलाइन निकाल येत्या उद्या 13 जून रोजी दुपारी 1 वाजता जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांची दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर निकालाच्या तारखांविषयीची खोटी माहिती फिरत होती, अखेर राज्य मंडळाकडून निकालाच्या तारखेची अधिकृत घोषणा करण्यात आल्याने या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.
दरवर्षी दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो, यंदा निकाल जाहीर होण्यास एक आठवडा विलंब झाला आहे. त्यामुळे आपल्याला किती टक्के गुण मिळाले याबाबतची विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता ताणली गेली आहे. दहावीच्या परीक्षेसाठी 14 लाख विद्यार्थ्यांनी मंडळाकडे आवेदन पत्रे भरली होती. राज्य शासनाने अध्यादेश काढून चित्रकला, संगीत आदी कला विषयांच्या गुणांचा समावेश दहावीच्या गुणपत्रिकेत करण्याचा निर्णय घेतला. ऐनवेळी कलागुणांची नोंद करावी लागल्याने दहावीचा निकाल लावण्यास विलंब लागल्याचे सांगण्यात येत आहे.
तुम्ही दहावीचा निकाल एसएमएसवरही मिळवू शकता. बीएसएनएल ग्राहकांनी MHSSC <स्पेस> <सीट नंबर> आणि 57766 या नंबरवर एसएमएस पाठवू शकता, तसेच आयडिया, व्होडाफोन, रिलायन्स, टाटा डोकोमो आणि बीएसएनएल नेटवर्क धारकांनी MAH10<स्पेस> <रोल नंबर> टाइप करून 58888111 या नंबरवर एसएमएस पाठवावा.
-अधिकृत संकेतस्थळ  https://mahahsscboard.maharashtra.gov.in/
  इथे  10वीचा निकालवर पाहता येईल.


दि. १3/०६//२०१७
१०  वी २०१७ चा निकाल पाहण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा.
१) सर्व प्रथम अधिकृत बेब साईट वे जाऊन LOG IN करावे.
२) class 10th (X) S.S.C Results 2017 यावर क्लिक करा.
३) विद्यार्थी नाव , रोल नं, जन्म तारीख टाका
४) आईचे नाव टाका.
५) search वर क्लिक करा.
6) सदर निकाल dounload देखील करू शकता.
तसेच खालील वेबसाईट वर पाहु शकतात.
 mahresult.nic.in.

www.mahresult.nic.in

http://result.mkcl.org

mh-ssc.ac.in

 http://m.rediff.com/exam_results

Monday, 29 May 2017

12 वीचा निकाल 2017

12 वीचा निकाल 2017
दि. ३०/०५/२०१७
१२ वी २०१७ चा निकाल पाहण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा.
१) सर्व प्रथम अधिकृत बेब साईट वे जाऊन LOG IN करावे.
२) class 12th (XII) Higher secondary Certificate HSC Results 2017 यावर क्लिक करा.
३) विद्यार्थी नाव , रोल नं, जन्म तारीख टाका
४) सदर निकाल dounload देखील करू शकता.

निकाल पाहण्यासाठीखालील ठिकाणी क्लिक करा.
http://mahresult.nic.in 
www.msbshse.ac.in 
http://mh-hsc.ac.in/homepage.aspx
www.hscresult.mkcl.org आणि
www.rediff.com/exam 
या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल.

Sunday, 28 May 2017

बदली संदभात माहिती अपडेट

*सर्वच जि.प.ला.लागू पडेल अशी  बदली प्रक्रिया व बदलीचे विवरणपञ.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
💐जिल्हयाची वास्तव सेवाजेष्ठता यादी प्रसिद्ध झाली आहे. सदरील यादीत *आपली सर्व माहीती अचूक आहे का? त्याची खात्री करा*
💐जर बदलीपात्र यादीत तुमची काही माहीती चुकीची असेल तर हरकत घ्या *दुरुस्तीचा लेखी अर्ज कार्यालयास देऊन पोच घ्या* ही यादी *अंतिम झाल्यानंतरच* आपले बदलीचे विवरणपत्र भरून दयावे
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
आता यादीचे व्यवस्थित आकलन करून खालीलप्रमाणे बदलीचे विवरण पत्र भरून आपल्या *कें प्र कडे देऊन पोच घ्या*
*1⃣विवरण पत्र-१*
*जिल्यात सुगम क्षेत्रात दहा वर्ष सलग सेवा झालेल्या प्रत्येक शिक्षकाने हे विवरण पत्र भरून दयावे*
यामध्ये अ आणि आ असे दोन भाग आहेत
विनंती बदली नको असेल तर "अ"ची निवड करा
विनंती बदली पाहीजे असेल तर "आ"ची निवड करा
शाळांची निवड करताना प्रथम रिक्त पदे नंतर तुमच्यापेक्षा ज्युनियर शिक्षक जास्त असलेल्या २० शाळा निवडाव्या.
,*जर पसंतीक्रमानुसार तुम्हाला शाळा देणे शक्य नसेल तर शिल्लक रिक्तपदी आपली विनंती बदली प्रशासन करु शकते हा मोठा धोका आहे*
*बदलीस पात्र शिक्षकाची बदली होणारच असे बंधनकारक नाही*
म्हणून शाळा सोईची असेल तर *अ* ची निवड करा, शाळा खूपच गैरसोईची असेल  तर *आ* ची निवड करने संयुक्तिक ठरेल

*2⃣ विवरण पत्र-२*
हे प्रपत्र अवघड क्षेत्रात काम करणाऱ्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी भरायचे आहे

*3⃣विवरण पत्र - ३*
विवरण पत्र ३ हे विशेष संवर्ग भाग १ मधील *अ*ते *औ*मध्ये येणाऱ्या तसेच *शुद्धीपत्रकातील* अंतर्भूत शिक्षकांनी भरुन दयावयाचे आहे
जर बदलीतून सूट पाहीजे असेल म्हणजेच सोईच्या ठिकाणी असाल तर मुद्दा क्र ८ समोरील चौकोणात✅ अशी खूण करा
किंवा तुमची सध्याची शाळा बदलायची असेल तर मुद्दा क्र समोर❎ खूण करा
आणि विनंती बदलीसाठी २० शाळांचा पसंतीक्रम द्यावा
*विशेष संवर्ग भाग १चे विवरण पत्र भरण्यासाठी सेवेची कसली अट नाही* जिल्यात कुठेही त्यांची बदली होऊ शकते
*4⃣विवरण पत्र-४*
जर पती आणि पत्नी यांच्या कार्यरत शाळामधील अंतर जर 3O कि मी पेक्षा जास्त असेल तर त्या *दोघांना विशेष संवर्ग २*चा दर्जा प्राप्त होतो.
म्हणून त्या दोघांपैकी एकाने ( म्हणजे ज्याला बदली पाहीजे आहे) विवरण पत्र- ४ भरून दयावे
*विशेष संवर्ग भाग २ चा लाभ घेण्यासाठी सेवेचे, सेवाजेष्ठतेचे कसलेही बंधन नाही*
तो आपल्या जोडीदाराचीसुद्धा शाळा मागू शकतो.
अर्ज एकाने केल्यानंतर जर दुसऱ्याचे नांव बदली पात्र यादीत असेल तर ते वगळले जाईल
*जर पती- पत्नी कर्मचाऱ्यांच्या कार्यरत शाळामधील अंतर 3OKM पेक्षा कमी असेल तर त्यांना विशेष संवर्ग भाग २ चा दर्जा प्राप्त होणार नाही*
मात्र ३0KM च्या आतील (म्हणजे एकत्रीकरण झालेले)पती पत्नींपैकी एकाला किंवा दोघाला विनंती बदली पाहीजे असेल असेल तर ३0 KM च्या आत*१ युनिट* मानून एकाच शाळेत किंवा वेगवेगळ्या शाळेत बदली मागता येते. मग या ठिकाणी पती पत्नी या *दोघांपैकी १ बदली पात्र आणि १ बदली अपात्र असेल* तरीही त्यांना १ युनिट मानून विनंती बदली मागता येणार आहे त्यांनी २० पसंतीक्रम देताना *प्रथम रिक्त* पदांची निवड करावी. नंतर तुमच्यापेक्षा ज्युनिअर शिक्षकांच्या शाळांचा समावेश पसंतीक्रमात करावा
त्यांनी *विवरण पत्र क्र १* भरुन दयावे
*टिप*-
१)बदलीपात्र शिक्षकाने जर *विवरणपत्र भरून नाही दिले* अन प्रशासकीय कारणाने जर त्याची बदली झाली तर प्रशासन दिल त्या ठिकाणी जावे लागेल म्हणून *प्रत्येक बदली पात्रने विवरणपत्र भरून देणे आवश्यक आहे*
२)*जिल्हा बदलीने*आपल्या जि प मध्ये आलेल्या सर्वांची *सलग सेवा* जिल्हा अंतर्गत बदल्यांसाठी *या जिल्हातील हजर दिनांकापासुन* पकडली जाणार आहे तसा शासन निर्णय पूर्वीपासुन आस्तित्वात आहे
३)विशेष संवर्ग शिक्षक भाग १, आणि विशेष संवर्ग शिक्षक भाग २ यांना *विनंती बदलीसाठी सेवेची कोणतीही अट नाही* अफवांवर विश्वास ठेऊ नका
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
संकलन आनंद देशपांडे

Saturday, 18 March 2017

गणित द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन सरावसंच


द्वितीय सत्रातील संकलित मूल्यमापन चाचणीच्या गणित विषयाच्या सराव प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी वर्गामोरील बटनावर क्लिक करा.
गणित प्रश्नपत्रिका 
पहिली  Download 
दुसरी  Download 
तिसरी  Download 
चौथी  Download 
५ ते ८  घटक निहाय नमुना संच 
घातांक  Download 
दशांश अपूर्णांक Download 
नफा तोटा  Download 
परिमेय व अपरिमेय  Download 
बीजगणित  Download 
भूमिती  Download 
वर्ग आणि वर्गमूळ  Download 
शेकडेवारी  Download 
🌟 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌟💠
🕳★🕳♍💲🅿🕳★🐊

☝🏿 5 व 6 एप्रिलला घेण्यात येणाऱ्या मराठी व गणित विषयाच्या सर्व वर्गाच्या  सराव प्रश्नसंच direct download करण्यासाठी  खाली क्लिक करा

http://rangnathkaile.blogspot.com
⛲⛲⛲⛲⛲⛲⛲⛲

👉🏾 संकलित मूल्यमापन 2 ( द्वितीय सञ) च्या सर्व  वर्गाच्या सर्व विषयाच्या प्रश्नपञिका डाउनलोड करण्यासाठी  क्लिक करा.
http://rangnathkaile.blogspot.in/p/blog-page_45.html?m=1

🛏🛏🛏🛏🛏🛏🛏🛏

👉 प्रवासातील गॅजेटगिरी


या उपकरणाबरोबर आपण फोरजी नेट असलेले कार्ड घेतले की एकाच वेळी चार ते पाच

नीरज पंडित

कधी एकदा वार्षिक परीक्षा संपतायेत आणि ठरलेल्या लांबपल्ल्याच्या प्रवासाला निघतोय, असे अनेकांना वाटत असेल. प्रवासाची तयारी करताना आपली काळजी घेण्यासाठी जशा आपण अनेक वस्तू घेतो, तशाच वस्तू आपल्या लाडक्या गॅजेट्सच्या काळजीसाठीही घ्याव्यात. तसेच अनेक असे गॅजेट्स आहेत जे आपल्याला खरोखरच प्रवासात उपयुक्त ठरू शकतात. पाहुयात अशाच काही गॅजेट्सविषयी.

मनोरंजनाची साथ

प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी हॉटेलपासून खूप लांब प्रवास करावा लागतो. या प्रवासात आपल्याला अनेकदा कंटाळा येतो. यामुळे पुस्तक वाचण्यापासून ते गाणी ऐकण्यापर्यंतचे अनेक पर्याय तुमच्यासमोर असतात. जर तुम्हाला पुस्तके वाचूनही कंटाळा आला तर तुम्ही आयपॅड, एमपीथ्री प्लेअरसोबत घेतला तर गाणी ऐकू शकता. तसे पाहता मोबाइलमध्ये गाणी असतातच, पण प्रवासात असताना मोबाइलची बॅटरी कमीत कमी खर्च होणे योग्य असते. यामुळे या उपकरणांचा वापर करून तुम्ही गाणी ऐकू शकतात. इतकेच नव्हे तर तुम्हाला टीव्ही पाहायचा असेल तर अ‍ॅपल टीव्हीसारख्या अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही टीव्हीही पाहू शकता. अ‍ॅपल टीव्ही हा केवळ आयओएसधारकांसाठीच मर्यादित आहे असे नाही, तर प्ले स्टोअरवरही डिट्टो टीव्ही, हॉटस्टार, नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइमसारखे पर्याय उपलब्ध आहेत. याचबरोबर एका वेळी एकाच्याच मोबाइलची बॅटरी खर्च करावयाची असेल तर तुम्ही छोटा पोर्टेबल स्पीकरही सोबत नेऊ  शकता. जेणेकरून तुम्ही गाडीत किंवा चालत असताना गाण्यांचा अस्वाद घेऊ  शकता.

पॉवर बँक

प्रवासाला जाताना माणसी किमान एक असा मोबाइल आपल्यासोबत असतोच. यामुळे हा फोन सतत चार्ज राहण्यासाठी पॉवर बँक घेण्यास अजिबात विसरू नका. बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये मोबाइल चार्जिगसाठी सॉकेट दिलेले असतात, मात्र ते पुरेसे नसल्यामुळे आपला नंबर येईपर्यंत वाट पाहावी लागते. यामुळेच जर तुम्ही पॉवर बँक सोबत ठेवली तर तुम्हाला तुमची उपकरणे बसल्या जागेवर चार्ज करणे शक्य होणार आहे. पॉवर बँकेची खरेदी करत असताना जास्तीतजास्त एमएएचची बँक खरेदी करावी, जेणेकरून तुम्हाला जास्तीतजास्त उपकरणे चार्ज करणे शक्य होईल. सध्या बाजारात १५०० एमएएचपासून ते २० हजार एमएएचची क्षमता असलेली पॉवर बँक उपलब्ध आहेत.

वाय-फाय राऊटर

इंटरनेट ही सध्याच्या तरुणाईची गरज बनली आहे, पण रोमिंगमध्ये असताना नेटपॅक रिचार्ज करणे अनेकदा परवडतेच असे नाही. अनेक ठिकाणच्या हॉटेलमध्ये वायरनेटचा अ‍ॅक्सेस अनेकदा मोफत दिला जातो, पण वायफायसाठी दर आकारले जातात. यामुळे जर वायफाय वापरायचे असेल तर तुम्हाला अतिरिक्त पैसे मोजावे लागतात. यामुळे जर तुम्ही फिरते वाय-फाय राऊटर घेऊन गेलात तर तुम्ही हॉटेलमधील इंटरनेट जोडणीला राऊटर लावून तुमच्या खोलीपुरते वाय-फाय सुरू करून घेऊ  शकता. यामध्ये नॅनो राऊटर्सही मिळतात. जे तुम्हाला प्रवासात घेऊन जाणे सोपे पडते. याच्या माध्यमातून तुम्हाला १५० एमबीपीएसपर्यंतचा वेग मिळू शकतो. तसेच सध्या सर्वच मोबइल कंपनीने वाय-फाय उपकरणं बाजारात आणले आहे. या उपकरणाबरोबर आपण फोरजी नेट असलेले कार्ड घेतले की एकाच वेळी चार ते पाच फोन यावर आपण जोडू शकतो. तसेच फोरजी नेट संपल्यावर टूजीनेट अनलिमिटेड देणाऱ्या ऑफर्सही कंपन्यांकडून दिल्या जात आहेत.

युनिव्हर्सल अ‍ॅडप्टर

तुम्ही सतत प्रवास करत असाल आणि तुम्हाला लॅपटॉप किंवा टॅबलेट चार्ज करायची गरज पडत असेल तर तुम्ही युनिव्हर्सल अ‍ॅडप्टर बाळगणे फायद्याचे ठरेल. या अ‍ॅडप्टरमध्ये यूएसबी पोर्टही देण्यात आला आहे. ज्याचा वापर करून तुम्ही तुमची उपकरणे चार्ज करू शकता. याचबरोबर थ्री-पिन प्लगही देण्यात आला आहे. यामुळे ज्या उपकरणांना प्लग आहेत ती उपकरणेही तुम्ही चार्ज करू शकता. या प्रकारचा अगदी साधा अ‍ॅडप्टर ३०० रुपयांपासून उपलब्ध आहे.

सेल्फी स्टिक

तरुणाईमध्ये सेल्फीबाबत प्रचंड आकर्षण आहे. यामुळे बहुतांश लोकांकडे फ्रंट कॅमेरा किमान पाच मेगापिक्सेलचा तरी असतोच. जर तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणासह सेल्फी काढावयाचा असेल तर ही स्टिक नक्कीच तुम्हाला उपयोगी पडू शकते. याचबरोबर तुमचा ग्रुप फोटो काढावयाचा असेल तर अनेकदा आपण सोबत असलेल्या दुसऱ्या ग्रुपच्या व्यक्तींना किंवा गाइड अथवा चालकांना फोटो काढण्याची विनंती करतो. मात्र त्यांच्याकडून आपल्या मनाजोगा फोटो येईलच असे नाही. यामुळे अशा वेळीही ही सेल्फी स्टिक आपली मदत करू शकते. बाजारात अगदी ५९९ रुपयांपासून चांगल्या दर्जाच्या सेल्फी स्टिक उपलब्ध आहेत. सध्या बाजारात रिमोट असलेल्या स्टिकही आल्या आहेत.

ई-बुक रीडर

लांब पल्ल्याचा प्रवास असेल तर प्रवासात वेळ घालवण्यासाठी तसे अनेक पर्याय असतात. यामध्ये पत्ते, अंताक्षरी खेळण्यापासून अनेक पर्यायांचा समावेश आहे. पण अनेकदा त्याचाही कंटाळा येतो. अशा वेळी पुस्तकांची मदत होऊ  शकते. तुम्हाला बॅगमध्ये पुस्तके घेऊन जाणे अवघड होत असेल तर तुम्ही किंडलसारखे ई-बुक रीडर सोबत नेऊ शकता. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीची पुस्तके डाऊनलोड करून ठेवलीत की, तुम्हाला पाहिजे तेव्हा पुस्तके वाचता येऊ  शकतील. ई-बुक रीडरसाठी तुमच्याकडे किंडलसोबतच आयपॅड तसेच स्मार्टफोनमधील ई-बुक अ‍ॅपचे पर्यायही उपलब्ध आहेत. या अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या फोनवर ई-बुक वाचू शकता.

नीरज पंडित niraj.pandit@expressindia.com
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
मे 2017 मध्ये यवतमाळ येथे महाराष्ट्र शिक्षक पँनल तर्फे तंञज्ञान व ज्ञानरचनावादी शिक्षक सम्मेलन आयोजित करण्यात येणार आहे.
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
     🖋 रंगनाथ कैले 🖋
          9975439380
       ┄─┅━━▣▣▣━━┅─•

भाषा द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन सरावसंच


द्वितीय सत्रातील संकलित मूल्यमापन चाचणीच्या भाषा विषयाच्या सराव प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी वर्गामोरील बटनावर क्लिक करा.
भाषा प्रश्नपत्रिका 
पहिली  Download 
दुसरी  Download 
तिसरी  Download 
चौथी  Download 
पाचवी  Download 
सहावी  Download 
सातवी  Download 
आठवी  Download 










Saturday, 4 March 2017

शिष्यवृत्ती परीक्षा निकाल फेब्रुवारी २०१७ अंतिम उत्तरसुची

पुर्व उच्च प्राथमिक परीक्षा  २०१७ अंतिम उत्तरसुची पाहण्यासाठी खालील ठीकाणी क्लिक करा.


😄इयत्ता पाचवी पेपर १ 

😄इयत्ता पाचवी पेपर २


पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०१७ अंतिम उत्तरसुची पाहण्यासाठी खालील ठीकाणी क्लिक करा


😄इयत्ता आठवी पेपर १ 

😄इयत्ता आठवी पेपर २ 


इतर हि माध्यमांच्या उत्तरसुची शासनाच्या संकेत स्थळावर उपलब्ध झालेल्या आहेत. त्यासाठी खालील लिंक ला भेट दया.

http://mscepune.in/Scholarship_PAnsKey2017.aspx









Monday, 27 February 2017

स्टूडेंट पोर्टल अपडेट

स्टूडेंट पोर्टल अपडेट


विद्यार्थ्यांचे आधार कार्ड valid व invalid झाले का हे पहाणे



SARAL Online.com

स्टूडेंट पोर्टल वर विद्यार्थी आधार कार्ड वेरिफाइ करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे

आपण स्टूडेंट पोर्टल वर कोणत्या विद्यार्थ्यांचे आधारकार्ड valid व invalid झाले हे पाहू शकता

Reports मध्ये आधार वर जावून status मध्ये आपल्याला कोणत्या वर्गाचे किती विद्यार्थ्यांचे आधारकार्ड valid , blank व invalid संख्या पाहू शकतो

रिपोर्ट्स मध्ये आधार ऑप्शन मध्ये invalid - valid मध्ये आपण इयत्ता , तुकडी नुसार valid , invalid व blank आधार विद्यार्थ्याचे नावानुसार पाहू शकतो

तंबाखू मुक्त शाळा अभियान

अप्लीकेशन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Monday, 13 February 2017

मतदान ओळख पत्र शोधा

मतदान ओळखपत्र  
शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

block short link.

https://goo.gl/nKWPP9

संख्याज्ञान

                ⏳संख्या ज्ञान💟                      🔹 संख्या चा शोध कसा लागला
   ~~~~~~~~~~~~~~~~~~

      आपणास माहिती आहे मानव हा अश्मयुगाच्या आधीपासून टोळी , वसाहत करून रहात असे . त्या वेळी नक्कीच गणित संशोधन  , संख्या  , क्रिया या गोष्ट त्यास अवगत नव्हत्या . तरी तो आपल्या घरातील माणसे कसे लक्षात ठेवत असेल ? पाळीव प्राणी किती कसे लक्षात ठेवत असेल ?
       सुरवातीला माणूस हातीची बोटे मोजुन किंवा बोटे दाखवून घरातील व्यक्ती , प्राणी मोजत असतील ...☝🏻  , ✌🏻, 🖐🏻, 👐🏻
नंतर हळूहळू ...
दगड ठेवून मोजत असेल...
जसे...
  🔻  🔻🔻🔻   🔻🔻🔻🔻
   तसेच एक साठी एक रेषा - |
दोन साठी - | |  , तीन साठी  | | |
असे निसर्गाच्या सानिध्यात माणूस मोजण्याची क्रिया करत असेल व यातूनच ....
1 , 2 , 3 , 4 , 5 ,.......
अशा संख्याचा उगम झाला व यालाच आपण .....

1 ]  *नैसर्गिक  किंवा  मोजसंख्या*
     ~~~~~~~~~~~~~~~~~
         1 , 2 , 3 ,4 , 5 .......

असे आपण संबोधण्यात आले.

============================
         आपण वर पाहिले नैसर्गिक किंवा मोजसंख्या चा उगग कसा झाला असेल .
      माणूस हळूहळू  समुहात रहात असताना व्यक्ती  , प्राणी सांगत असताना नैसर्गिक संख्या चा वापर करून माहिती देत असे .

     परंतु काही च नाही यासाठी काही तरी दाखवायला हवे. तुमच्या कडे काही च प्राणी , वस्तू  नाहीत तर कोणत्या चिन्ह चा वापर करावा ? काहीच नाही कसे दाखवावे ही समस्या निर्माण झाली .
     आपणास माहिती आहेत . समस्या / गरज ही शोधाची जणनी आहे . त्यातुनच काहीच नाही यासाठी ....
वेगवेगळ्या ठिकाणी अनेक चिन्ह वापरण्यात येवू लागली .
पोकळ गोल   - सुद्धा अनेक वेळा
~~~~~~~~
काही च नाही साठी वापरण्यात येवू लागले .
       यातुनच शून्य चा शोध लागला .
शून्य (  0 )  शोध लागला व ते 1 च्या आधी लिहला जावू लागला .व संख्या पुर्ण झाल्या असे वाटले म्हणून दुसरा संख्या संच पुर्ण संख्या संच म्हणून ओळखला जावू लागला .

2]  *पूर्णसंख्या संच*  -
   ~~~~~~~~~~~
        0 , 1 , 2 , 3 , 4 , .......

============================

दुसरा संख्या संच 0 वाढवुन पूर्णसंख्या संच झाला . परंतु याच काळात संख्या वरील क्रिया ही उदयास आल्या .

     बेरीज , करणे वजा करणे या क्रिया करत असता....
पुढीलप्रमाणे  समस्या निर्माण झाल्या असाव्यात...

   3 मधुन 7 गेले  =  ??
   6 - 8  =  ??

वरील प्रश्न चे उत्तर आपण आता सहज देवू शकतो परंतु त्या वेळी चा विचार करा फक्त आपणास पूर्णसंख्या संच माहिती होता.

यातुनच रून संख्या उदयास आल्या  व संख्या संच वाढुन पुर्णांक संख्या संच निर्माण झाला .

3 ] पुर्णांक संख्या संच -
     ~~~~~~~~~~~
....-3 , -2 , -1 , 0 ,  1 , 2 , 3 , 4 ,...

या संख्या संचास पुर्णांक संख्या संच म्हणून उदयास आला  .

===========================

    यानंतर अपूर्ण संख्या लेखनाची समस्या निर्माण झाली व परिमेय संख्या चा शोध लागला...

4  ]  *परिमेय संख्या*  -
      ~~~~~~~~~
सर्वच पुर्णांक संख्या  + रून धन अपूर्णांक .

व्याख्या  - p/q स्वरूपातील कोणत्याही संख्या फक्त q हे शून्य नसावे.

===========================

5]  *अपरिमेय संख्या*  -
     थोडक्यात पुर्ण नसणाऱ्या संख्या ची वर्गमुळे म्हणजे अपरिमेय संख्या होय.
उदा -  √13 , √75 इत्यादी

===========================
6 ]  *वास्तव्य संख्या*  -
    ~~~~~~~~~~~
      -  परिमेय व अपरिमेय  दोन्ही संख्या संच मिळून वास्तव संख्या संच होय.

===========================
7]   *अवास्तव संख्या*  -
     ~~~~~~~~~~~
        सर्वच रून संख्या ची वर्गमुळ म्हणजे अवास्तव संख्या होय .

उदाहरणार्थ  -  √-9 , √-25 , √-10

============================
            ✍🏻  *सारांश* ....✍🏻

⏹⏹⏹ संख्या चे प्रकार   ⏹⏹⏹

⏺  *नैसर्गिक संख्या / मोज संख्या*
   -  { 1 , 2 , 3 ,4.....}

⏺  *पुर्ण संख्या*
   -  {  0 , 1 , 2 , 3 ......}

⏺  *पुर्णांक संख्या*
    -  { ....-3 , -2 , -1 , 0 , 1 ,2, 3...}

 ⏺  *परिमेय संख्या*
    -  {  p/q  कोणत्याही पुर्णांक संख्या परंतु  q हे शून्य नसावे
   उदाहरणार्थ - 4/5 , 2/7  }
 
 ⏺ *अपरिमेय संख्या*
    -  {  पुर्ण वर्ग नसणाऱ्या संख्या ची वर्गमुळ म्हणजे अपरिमेय संख्या होय.
    उदा  - √12 , √51 इत्यादी }


⏺  *वास्तव्य संख्या*
  -  {  परिमेय व अपरिमेय संख्या एकञित संच म्हणजे वास्तव संख्या होय }

⏺  *अवास्तव संख्या*
   -  {  सर्वच रून संख्या चे वर्ग मुळ  म्हणजे अवास्तव संख्या होय  .
  उदाहरणार्थ   √-6 , √ -10 √ - 25  }
 
==================
 ज्या संख्येच्या एकक़स्थानी 0,2,4,6,8 7यापैकी एक अंक असतो तिला सम संख्या म्हणतात
उदा .  12 ,126, 68 , 62 800

 0,2,4,6,8 असेल तर सम संख्या असू शकते,


2) ज्या संख्येच्या एककस्थानी 1,3,5,7,9 यापैकी एक अंक असतो.तिला विषम संख्या म्हणतात. उदा. 11,13,15........99.....


 5) ज्या दोन मूळ संख्याच्या दरम्यान एक संयुक्त संख्या असते अशा संख्याना जोडमूळ संख्या म्हणतात
उदा 3व 5 , 5 व 7 , 11 व 13
1 ते 100 पर्यंत अशा जोडमुळ संख्याच्या 8 जोड्या आहेत .

5) ज्या दोन क्रमवार मूळ संख्यांमधे दोनचा फरक आहे अशा संख्याना जोडमूळ संख्या म्हणतात
उदा 3 व 5 , 5 व 7 , 11 व 13
1 ते 100 पर्यंत अशा जोडमुळ संख्याच्या 8 जोड्या आहेत .

2 ही सर्वात लहान सम मूळ संख्या आहे.


ज्या दोन संख्यांचा फक्त 1 ही संख्या सामायिक विभाजक असते त्या संख्यांना परस्परांच्या सहमूळ किंवा परस्पर मूळ संख्या म्हणतात
उदा. 4 व5
       3व17


 1 ते 100 दरम्यान 74 *संयुक्त संख्या* आहेत..

 १ ते १०० मध्ये मुळ संख्या  २५ संयुक्त संख्या  ७४  व १ ही मुळ,व संयुक्त नाही


 सहमुळ संख्या - जर दोन संख्याचा म. सा. वि.=1 असेल तर त्यांना सहमुळ संख्या म्हणतात.
उदाहरण. 11व12
म.सा.वि.=1

सहमूळ संख्या -ज्या दोन किंवा अधिक संख्याना 1व्यतिरिक्त अन्य सामाईक विभाजक नसतो त्या संख्याना सहमूळ संख्या म्हणतात      उदा.25व28, 12व35


: मूळ संख्या- 1ते 10-2,3,5,7             11ते20-           11,13,17,19                   21ते30-            23,29                                 31ते40-            31,37                                41ते50-            41,43,47                           51ते60-            53, 59                             61ते70-            61,67                   71ते80-            71,73,79            81ते90-            83,89                91ते100-          97
 🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹

📈  संख्या  प्रकार

1)  सम संख्या -

    -  ज्या संख्येच्या एकक़स्थानी 0,2,4,6,8 7यापैकी एक अंक असतो तिला सम संख्या म्हणतात
उदा .  12 ,126, 68 , 62 800

2) विषम संख्या -  

 -   ज्या संख्येच्या एककस्थानी 1,3,5,7,9 यापैकी एक अंक असतो.तिला विषम संख्या म्हणतात. उदा. 11,13,15........99.....

3) संयुक्त संख्या -

1 ते 100 दरम्यान 74 *संयुक्त संख्या* आहेत..


4) मुळ संख्या   -

मूळसंख्या-ज्या संख्येचे 1व तीच संख्या असे दोनच विभाजक असतात त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात      उदा.2,3,5,7,11,...

2 ही सर्वात लहान सम मूळ संख्या आहे. -

5)  जोडमुळ संख्या   -

-   ज्या दोन मूळ संख्याच्या दरम्यान एक संयुक्त संख्या असते अशा संख्याना जोडमूळ संख्या म्हणतात
उदा 3व 5 , 5 व 7 , 11 व 13
1 ते 100 पर्यंत अशा जोडमुळ संख्याच्या 8 जोड्या आहेत .

6)  सहमुळ  संख्या

ज्या दोन संख्यांचा फक्त 1 ही संख्या सामायिक विभाजक असते त्या संख्यांना परस्परांच्या सहमूळ किंवा परस्पर मूळ संख्या म्हणतात
उदा. 4 व5
       3व17


सहमुळ संख्या - जर दोन संख्याचा म. सा. वि.=1 असेल तर त्यांना सहमुळ संख्या म्हणतात.
उदाहरण. 11व12
म.सा.वि.=1


7) *ञिकोणी संख्या*

क्रमवार संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात
1=1×2÷2
3=2×3÷2
6=3×4÷2

8)  *वर्ग संख्या / चौरस संख्या*

      -  वर्ग संख्या नाच चौरस संख्या असे म्हणतात
उदाहरणार्थ  -  4 , 16 , 25 , 36 ,49

9) *परीपुर्ण संख्या*   -

 परिपूर्ण संख्या--ती संख्या सोडून तिच्या अवयवांची बेरीज त्या संख्येएवढी असते. उदा. 6,  28, 496

10)  *धन संख्या  व रून संख्या*
     -

   -  संख्या रेषावरील शून्य च्या उजवीकडे धन संख्या व डावीकडे रून संख्या असतात


🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
 9) परिपूर्ण संख्या--ती संख्या सोडून तिच्या अवयवांची बेरीज त्या संख्येएवढी असते. उदा. 6,  28, 496

6---1,2,3     1+2+3=6                 28----1,2,4,7,14      1+2+4+7+14=28 (परिपूर्ण संख्या-6 एकमेव एक अंकी, 28एकमेव दोन अंकी, 496-एकमेव तीन अंकी)

1) पूर्ण वर्ग संख्येच्या एककस्थानी *2,3,7,8*
हे अंक कधीच नसतात..

2) पूर्ण वर्ग संख्येच्या एककस्थानी *5*  हा  अंक असेल तर दशकस्थानी *2* हा अंक असतोच..



1 , 3 , 6 , 10 ,15 ,21 ,.....

या ञिकोणी संख्या होय.....

ञिकोणी का म्हणतात ....

✍🏻   1            •



✍🏻   3              •
                    •       •


✍🏻  6                 •
                     •          •
                 •        •        •  


✍🏻   10               •
                      •          •
                  •        •         •
              •       •         •       •  


या संख्या इतके ञिकोणात बिंदू रचना करता येते म्हणून यांना ञिकोणी संख्या असे म्हणतात .



 सर्वच वर्ग संख्या म्हणजे चौरस संख्या होय
=======================
      🔰  ञिकोणी संख्या 🔰


व्याख्या -  " दोन क्रमवार संख्या चा गुणाकार करून गुणाकाराची निम्मी संख्या म्हणजे ञिकोणी संख्या होय "


उदाहरणार्थ -

    क्रमवार संख्या  - 5 , 6

                            5 × 6
ञिकोणी संख्या  = ----------- = 15
                               2

वरील उदाहरणात  15 ही ञिकोणी संख्या आहे.


तर  5  व 6 यांना ञिकोणी संख्या चा पाया असे म्हणतात .

  =========================                            

👉 पहिली ञिकोणी संख्या

   = 1 × 2 / 2  = 1


👉 दुसरी ञिकोणी संख्या

    = 2 × 3 / 2  = 3


👉 तिसरी ञिकोणी संख्या

     = 3 × 4 / 2  = 6


👉 चौथी ञिकोणी संख्या

     =  4 × 5 / 2  = 10


👉 पाचवी ञिकोणी संख्या

    = 5 × 6 / 2  = 15


 👉 सहावी ञिकोणी संख्या

   = 6 × 7 / 2  = 21


अशाप्रकारे पुढील ञिकोणी संख्या शोधता येतील...

   

   28 ,  36  , 45  , 55 , 66 , 78 , 91 , 105 , 120, 136 ,......


अशा अनेक संख्या आपण शोधू शकतो.

=======================


🔷🔷 TET - 16/1/2016🔷🔷

काल झालेल्या परीक्षेत पहिलाच प्रश्न होता...

👉   6 ,  36  , 66 आणि 136 या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत ?


पर्याय   -

(1) चौरस संख्या

(2) आयत संख्या

(3) पंचकोणी संख्या

(4) ञिकोणी संख्या  ✅✅



🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷

नेहमी विचारले जाणारे उदाहरण -

👉   एक ञिकोणी संख्या देतात व त्याच्या पुढील चौथी , पाचवी अशी संख्या कोणती असा प्रश्न विचारला जातो ?


उदाहरणार्थ -

  55 च्या पुढील 5 वी ञिकोणी संख्या कोणती  ?


स्पष्टीकरण  -

 दिलेली ञिकोणी संख्या  = 55


या संख्येच्या दुप्पट करा = 55 × 2

                                 = 110


आता 110 हा कोणत्या दोन क्रमवार संख्या चा गुणाकार आहे शोधा....

आपणास समजेल ...

  10 × 11 =  110 येते.


10  + 5 =  15 .....


म्हणून , 110 नंतर 5 वी ञिकोणी संख्या

            15 × 16
      =  --------------  = 120
                 2


म्हणून ,  उत्तर   -  120


=======================ररचनावादी पध्दत _ एक खडा घ्या त्या भोवती चौरस काढा असे एक - एक खडा मिळवा व  चौरस बनवण्याचा प्रयत्न करा जर चौरस झाला तर किती खडयांपासून झाला याचा पडताळा घेतला असता वर्ग संख्या इतक्याच खडयांपासून चौरस होतोय हे समजेल म्हणून वर्गसंख्यांना चौरस संख्या म्हणतात
@@

 दिलेल्या संख्येच्या दुप्पट मधून वजा होणारी मोठ्यात  मोठी पूर्ण वर्ग संख्या शोधून काढा त्या संख्येचे वर्गमुल म्हणजे त्रिकोणी संख्येचा पाया आहे.....  यावरून         पाया xपुडील संख्या /2 करा त्रिकोणी संख्या मिळेल... नाहीतर त्रिकोणी संख्या नाही 🙏🙏

शाळा सिद्धी साठी राबवता येणारे उपक्रम

🎯शाळासिध्दी करीता शाळेत राबविता येण्यासारखे उपक्रम ( नवोपक्रम )
➖➖➖➖➖➖➖➖

♻१. पेपरलेस प्रशासन
♻२. प्रोजेक्ट ई लर्निंग
♻३. बोलीभाषेतून प्रमाणभाषेकडे
♻४.   दिवस नवा, भाषा नवी
♻५. पर्याप्त साधनांतून स्वंयप्रेरणेतून शब्द व वाक्य निर्मिती
♻६.  माझी कविता / विद्यार्थी काव्य संग्रह
♻७.  सू्र्यमालेचे अभिनव निरीक्षण
♻८.  बोलीभाषेतून शब्दकोश निर्मिती
♻९. गणित विषयातील संबोध संकल्पना रुजवणूक
♻१०. एक तास राष्ट्रासाठी
♻११.  भाषिक प्रयोगशाला
♻१२ .  पर्यावरण संरक्षक दल
♻१३. सौरऊर्जा जागरुकता व वापर
♻१४.  विषय खोली
♻१५. आम्ही स्वच्छता दूत
♻१६.  तंबाकूमूक्त शाळा
♻१७.  प्लास्टिक मुक्त शाळा
♻१८.  विज्ञान भवन
♻१९.  मैत्री संख्यांची
♻२०.  आदर्श परिपाठातून नैतिक मूल्य संवर्धन
♻२१.  एक दिवस गावासाठी
♻२२.  विषय कोपरा - प्रभावी माध्यम
♻२३.  विशेष विद्यार्थी कोपरा
♻२४.  पुस्तक भिशी
♻२५.  शालेय व वैयक्तिक स्वच्छता संकल्प
♻२६.  क्रीडा दूत
♻२७.  राष्ट्रीय महापुरुषांची यशोगाथा
♻२८.  हरित शाळा
♻२९.  प्रदूषण हटवा अभियान
♻३०.  चालता बोलता
♻३१. माझा मित्र परिवार
♻३२. माझे पूर्व ज्ञान
♻३३. शब्दगंगा
♻३४.  कौन बनेगा ज्ञानपती
♻३५. वर्ड पॉट
♻३६. हस्ताक्षर सुधार मोहिम
♻३७.  संख्यावरील क्रिया - एक छंद
♻३८.  प्रश्नमंजूषा
♻३९.  विविध स्पर्धांतून व्यक्तिमत्व विकास
♻४०.  बालआनंद मेळावे
♻४१.  सातत्य पूर्ण उपस्थिती
♻४२.  पुस्तक जत्रा
♻४३.  फन एंड लर्न
♻४४.  शंकापेटी
♻४५. स्वयंपूर्ण विद्यार्थी शोध
♻४६.  रोपवाटिका निर्मिती
♻४७. एक तास इंटरनेट
♻४८.  गांडूळ खत निर्मिती
♻४९.  Student of the day
♻५०.  एक तास मुक्त अभ्यास
♻५१. समस्या व सूचना पेटी
♻५२. किशोरवयीन मुलींचे शिक्षण
♻५३.  लोकसंख्या शिक्षण
♻५४.  स्वच्छ शाळा, सुंदर गाव
♻५५.  वाचाल तर वाचाल
♻५६.  बिखरे मोती
♻५७.  Book of the day
♻५८.  विशेष व्यक्तींच्या मुलाखती
♻५९.  बालसभा
♻६०.  माझ्या गावचा इतिहास
♻६१.  परिसरातील भूरुपांची ओळख
♻६२.  विविध शिबीरांतून विद्यार्थी विकास
♻६३.  प्रयोगातून विज्ञान
♻६४.  मुक्त वाचनालय
♻६५.  खरा मित्र उपक्रम
♻६६.  गृहपाठ गट
♻६७.  टाकाऊतून टिकाऊकडे
♻६८.  हस्तलिखित निर्मिती
♻६९.  मुक्त अभिव्यक्तितून भाषा विकास
♻७०.  वर्तमानपत्रातून वाचन व लेखन समृद्धि
♻७१. व्यक्तिमत्व विकास व संवर्धन
♻७२. परिसर भेटीतून विज्ञान परिचय
♻७३.  चला शिकूया लघू़द्योग
♻७४.  दैनंदिनी लेखन
♻७५.  नविन अक्षर, शब्द, वाक्य बॅंक
♻७६. विविध स्पर्धा परीक्षा परिचय व तयारी
♻७७. शालेय परसबाग
♻७८.  संभाषण, वाचन, लेखन विशेष झोन
♻७९.  खेळातून गणित शिकू
♻८०. परिसरातील झाडांची ओळख, उपयोग व संवर्धन
♻८१. स्व कल्पनेतून शोध निबंध लेखन
♻८२. सांकेतिक भाषेचे खेळ
♻८३. दप्तराविना शाळा, विद्यार्थी
♻८४. लेखक, कवि, विशेष व्यक्तींच्या भेटीतून विद्यार्थी विकास
♻८५.  परिसरातील कलांची ओळख
♻८६.  गृहोपयोगी कुटीरोद्योगांची ओळख
♻८७.  गावातील सांस्कृतिक प्रतिकांचा शोध व संवर्धन
♻८८.  शैक्षणिक सहलीतून विद्यार्थी विकास
♻८९.  काव्यनिर्मिती, रचना व गायन
♻९०.  पाणी व्यवस्थापन
♻९१. बलिराजा चेतना अभियान
♻९२.  जलसाक्षरता
♻९३.  तंत्रस्नेही विद्यार्थी
♻९४.  कथा निर्मिती / चित्र कथा निर्मिती
♻९५.  रेन वॉटर हार्वेस्टिंग
♻९६ . पुस्तक परिचय व भेट
♻९७.  विशेष गरजा असणा-या मुलांसाठी मनोरंजनात्मक खेळाभ्यास
♻९८ . निर्मल शाळा अभियान
♻९९.  विविध दिन साजरे करणे